Colvale Jail Dainik Gomantak
गोवा

Colvale Jail: कोलवाळ कारागृहातील चार कर्मचारी निलंबित

Colvale Jail: रावणवध’ भोवला: कैद्यांकडून व्हिडिओ व्हायरल

दैनिक गोमन्तक

Colvale Jail: पणजी नुकत्याच झालेल्या दसऱ्याच्या उत्सवानिमित्त कोलवाळ येथील कारागृहात रावणाच्या प्रतिमेचे दहन करताना त्यामध्ये फटाक्यांचा वापर करण्यात आला होता. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्याची दखल घेत या कारागृहातील साहाय्यक अधीक्षक, दोन जेलर व एक साहाय्यक जेलर मिळून चार कर्मचाऱ्यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.

त्यांच्या निलंबनाचा आदेश तुरुंग महानिरीक्षकांनी काढून त्यांच्याकडे स्पष्टीकरण मागितले असल्याची माहिती सूत्राने दिली. या घटनेप्रकरणी निलंबित करण्यात आलेल्यांमध्ये चंद्रकांत हरिजन (साहाय्यक अधीक्षक), महेश फडते (जेलर), अनिल गावकर (जेलर) व रामनाथ गावडे (साहाय्यक जेलर) यांचा समावेश आहे.

कोलवाळ कारागृहात रावणाची प्रतिमा साकारण्यात आली होती. या प्रतिमेमध्ये फटाक्यांचा वापर करण्यात आला होता. तुरुंग नियमानुसार कोणत्याच ज्वलनशील वस्तूचा वापर करण्यास बंदी आहे. मात्र, ड्युटीवर असलेल्या तुरुंग

अधिकाऱ्यांनी त्याला परवानगी दिल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. दसऱ्याच्या दिवशी कारागृहात उभारण्यात आलेल्या रावण प्रतिमेचे दहन करण्यात येणार होते. ही प्रतिमा कारागृहातील कैद्यांनीच तयार केली होती. त्यात फटाके घालण्यात आल्याने दहनावेळी मोठमोठ्याने फटाक्यांचा आवाज येत होता.

या दहनाचे चित्रीकरण खुनाच्या आरोपाखाली शिक्षा भोगत असलेल्या एका कैद्याने करून त्याने तो व्हिडिओ सोशल मीडियापर्यंत पोचवला होता. हा व्हायरल होऊन तो अधिकाऱ्यांपर्यंत पोचला. या प्रकरणाची गंभीर दखल तुरुंग महानिरीक्षकांनी घेत त्याची प्राथमिक चौकशी केली. यामध्ये या घटनेला त्या दिवशी उपस्थित असलेल्या तुरुंग अधिकाऱ्यांवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवून निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT