Arrested  Dainik Gomantak
गोवा

गोव्यातील जमिनी हडप प्रकरणात आतापर्यंत चौघांना अटक

‘पुरातत्त्व’चा धीरेश नाईक, मडकईकर गजाआड

दैनिक गोमन्तक

पणजी : जमिनी हडप प्रकरणाचा तपास करत असलेल्या विशेष तपास पथकाने शुक्रवारी रात्री पुरातत्व खात्यातील रेकॉर्ड ॲटंंडंट शिवानंद मडकईकर याला अटक केली. त्या अगोदर गुरुवारी रात्री उशिरा पुरातत्व खात्यातील कर्मचारी धीरेश नाईक याच्याही मुसक्या आवळल्या होत्या. त्याला न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. या प्रकरणातील अटक झालेला मडकईकर हा चौथा संशयित आहे.

विविध पोलिस स्थानकातून जमिनी हडपप्रकरणीच्या प्रलंबित असलेल्या सुमारे ३५ हून अधिक तक्रारी एसआयटीकडे दाखल झाल्या आहे. आसगाव येथील प्रकरण गंभीर असल्याने त्याच्या तपासकामावर अधिक लक्ष देऊन अधिक पुरावे जमा करत आहेत. तपासावेळी एसआयटीचे प्रमुख निधीन वाल्सन यांनी पुरातत्व खात्यात जाऊन तेथील कर्मचाऱ्यांकडे असलेल्या विविध कामांच्या ताब्यासंदर्भात माहिती मिळवली होती.

विक्रांतला ताब्यात घेल्यानंतर पुरातत्व खात्यातील जमिनीचे दस्तावेज महम्मद सुहैल आणून देण्यात मदत करत असल्याचे समोर आल्यावर त्यालाही अटक झाली. पुरातत्व खात्यातील धीरेश नाईक हा दस्तावेज खात्यातून देत होता. त्याच्या आधारे त्यानंतर बनावट दस्तावेज तयार करण्यात येत होते हे उघड झाल्यावर धिरेशला अटक केली. त्यानंतर मडकईकर याच्याकडे दस्तावेजचा ताबा होता व त्याचा धीरेश याच्याशी लागेबांधे असल्याची माहिती मिळाल्याने मडकईकर यालाही अटक झाली.

विक्रांत शेट्टीला जामीन मंजूर

शुक्रवारी संशयित विक्रांत शेट्टी याला म्हापशातील प्रथम श्रेणी न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला. उत्तर गोव्यातील सुमारे 5 हजार चौरस मीटरच्या किमान आठ मालमत्तांच्या फसवणूकीत विक्रांतचा थेट सहभाग असल्याचा ठप्पका एसआयटीने त्याच्यावर ठेवला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT