Calangute Theft Case Dainik Gomantak
गोवा

Calangute Theft Case: कर्नाटकमधील पर्यटकाच्या गळ्यातील सोनसाखळ्या हिसकावणार्‍या चौघांना अटक

Calangute Theft Case: पर्यटकांच्या सामानाची चोरी होण्याच्या घटना किनारी राजरोसपणे सुरूच आहेत.

Kavya Powar

Calangute Theft Case: पर्यटकांच्या सामानाची चोरी होण्याच्या घटना किनारी राजरोसपणे सुरूच आहेत.

कळंगुटमध्ये कर्नाटकमधील पर्यटकाची सोन्याची चेन तसेच रोकड चोरीची घटना समोर आली आहे. यामध्ये पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले आहे.

संपूर्ण प्रकरण असे की, कर्नाटकमधील पर्यटक संतोष एच.ए. हा फिरण्यासाठी कळंगुट येथे आला होता.

तो येथील लिटल गोवा हॉटेलमध्ये वास्तव्यास होता. दरम्यान, काही अज्ञात चोरांनी त्याच्यावर हल्ला करत त्याचा ओप्पो रेनो मोबाईल फोन, त्याच्याकडे असलेली 19 हजारांची रोख रक्कम तसेच त्याच्या गळ्यातील सोन्याच्या दोन चेन हिसकावून घेत तिथून पळ काढला.

सदर घटना काल (21 डिसेंबर, गुरुवार) पहाटेच्या दरम्यान घडली. यामध्ये पर्यटकाचा एकूण 1,95,000 हजारांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला आहे.

कळंगुट पोलिसांनी तपासादरम्यान या गुन्ह्यात सहभागी असलेल्या आरोपींची ओळख पटविण्यासाठी आणि शोधण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक अक्षय पार्सेकर यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार केले होते. यात चार जणांना अटक करण्यात आले.

मोर्सालीन सैदुल मोल्ला (20), राजू मोल्ला (19), अख्तर अली (24) आणि रकीफुल मोंडल (19) अशी आरोपींची नावे असून सर्वजण दक्षिण दिनाजपूर पश्चिम बंगाल येथील रहिवासी आहेत. पोलिसांची त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे सोन्याच्या चेन तुटलेल्या अवस्थेत आढळून आल्या.

कळंगुट पोलिसांनी चारही आरोपींवर भारतीय दंड संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाच्या सुनावणीसाठी त्यांना म्हापसा न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.

पोलीस निरीक्षक परेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अक्षय पार्सेकर, हेड कॉन्स्टेबल प्रशांत चोपडेकर, कॉन्स्टेबल अमीर गरड, विनय नाीक, मयुर गावडे, नितेश साळगांवकर, अभय चिंचिनकर, बाबूसो साळगांवकर यांनी चोरांना पकडण्यात महत्त्वाची भूमिका निभावली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT