Women's Day 2023 Dainik Gomantak
गोवा

Women's Day 2023 : महिला दिनी नावेलीत 'विविधा'तर्फे माजी विद्यार्थिनींचा सत्कार

नावेली येथील विविधा उच्च माध्यमिक विद्यालयात जागतिक महिला दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.

दैनिक गोमन्तक

Women's Day 2023 : नावेली येथील विविधा उच्च माध्यमिक विद्यालयात जागतिक महिला दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.

महिला दिनानिमित्त वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विविधाच्या माजी विद्यार्थिनींचा यानिमित्ताने सत्कार केला.

उच्च शिक्षण घेत वकील बनलेल्या समीरा गावस, शिक्षिका बनलेल्या निरुपा नाईक व डॉ. तेजा गावस आणि परीचारिका पदी कार्यरत असलेल्या श्रृती गावस यांना या कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले.

यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना निरुपा नाईक म्हणाल्या की, माझी शाळा मला माहेर असून माहेरवाशीणीला जो आनंद होतो, तोच आनंद आज मला झालेला आहे. मी माझ्या शिक्षकांमुळेच घडले. त्यांनी केलेल्या संस्कारांमुळे आणि प्रोत्साहनामुळेच घडले.

तर वकील समीरा गावस यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, पावलापावलावर या शिक्षकांकडून मिळालेल्या मार्गदर्शनामुळेच आपण आज यशस्वी वकिली करत आहे. प्राचार्य रमेश सिनारी यांनी सत्कार मूर्तींना सन्मानचिन्ह व शाल देऊन सन्मानित केले.

जेष्ठ शिक्षक एकनाथ मांद्रेकर यांनी महिला दिनानिमित्त आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. आपटे हिने केले तर कु. सलोनी मोरजकर हिने आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

US Iran Peace Deal: "आम्ही अमेरिकेचे गुलाम नाही!" नेतन्याहूंच्या मंत्र्याचा ट्रम्प यांच्या शांतता करारावर थेट हल्ला; जागतिक राजकारणात खळबळ

Brazil Helicopter Crash: ब्राझीलमध्ये दोन हेलिकॉप्टर्सची हवेतच भीषण टक्कर; 6 जणांचा मृत्यू, कार डीलरशिपच्या पार्किंगमध्ये कोसळल्याने 20 वाहने खाक VIDEO

Labh Drishti Rajyog: मंगळ आणि गुरुच्या संयोगाने बनतोय 'लाभ दृष्टी राजयोग'; 28 जूनपासून 3 राशींचे नशीब सोन्यासारखे चमकणार

US Iran Peace Deal: अमेरिका-इराण शांतता कराराला इस्रायलचा सुरुंग; नेतन्याहूंचा ट्रम्प यांना फोन, लेबनॉनमधून सैन्य मागे घेण्यास साफ नकार

Goa Politics: शिरोड्यात राजकीय वातावरण तापले, अनेक संभाव्य समीकरणांचे संकेत; काँग्रेसच्या भूमिकेबाबत अद्याप अनिश्चितता

SCROLL FOR NEXT