Goa Carnival 2023 Dainik Gomantak
गोवा

Goa Carnival 2023: पोर्तुगीजांनी स्वप्नातही कल्पना केली नसेल की... 'कार्निव्हल'वरून वेलिंगकरांची भाजपवर बोचरी टीका

कार्निव्हल फुलव-फळवण्याचा अट्टाहास का? आपल्या संस्कृतीचे विद्रुपीकरण का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Pramod Yadav

Goa Carnival 2023: गोव्यात येत्या शनिवारपासून जगप्रसिद्ध कार्निव्हल सुरू होत आहे. कोरोनाच्या संकटानंतर होणाऱ्या कार्निव्हलसाठी देश-विदेशातील अनेक पर्यटक हजेरी लावतील. शुक्रवारी पर्वरीत या महोत्सवाची कर्टन रेझर कार्यक्रम होणार आहे.

दरम्यान, गोव्यात होणाऱ्या कार्निव्हलवर टीका होत आहे. पोर्तुगीजांनी (Portuguese) सुरू केलेला कार्निव्हल फुलव-फळवण्याचा अट्टाहास का? आपल्या संस्कृतीचे विद्रुपीकरण का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

गोवा माजी संघचालक सुभाष वेलिंगकर (Subhash Velingkar) यांनी कार्निव्हलवर सडकून टीका केली आहे. मागील काही दिवसांपासून वेलिंगकर यांनी ट्विटरवर ट्विटची शृंखला ट्विट केली आहे.

'कार्निव्हल' कुणाचा वारसा? तो गोव्यात कुणी आणला? तो फुलव-फळवण्याचा अट्टाहास का? आपल्या संस्कृतीचे विद्रुपीकरण का?

पोर्तुगीजांनी स्वप्नातही कल्पना केली नसेल... की त्यांचा '#कार्निव्हल' गणवेषधारी कट्टर संघस्वयंसेवक असा मस्तकी घेऊन मिरवतील, नाचतील!

गोव्याच्या जमीन. .जल. .आकाशातही आता पोर्तुगीज '#कार्निव्हल'ची धूम! आपण सर्व 'गणवेषधारी' स्वयंसेवकांसाठी वेगळे सार्थक ते कोणते?

असे विविध ट्विट सुभाष वेलिंगकर यांनी केले आहेत.

सरकार यंदा पोर्तुगीजांची कार्निव्हल विकृती, जमीन, जल व आकाश अशी त्रिखंडांत नेणार! शिवाय " कर्टन रेझर " साठी एक दिवस ज्यादा! धम्माल! असेही ट्विट करत वेलिंगकर यांनी या महोत्सवावर आणि भाजप सरकारवर टीका केली आहे.

दरम्यान, 18 ते 21 या कालावधीत गोव्यात कार्निव्हलची धूम रंगणार आहे. 18 तारखेला पणजीपासून या महोत्सवाला सुरूवात होणार आहे. देश- विदेशातील हाजारो पर्यटक या महोत्सवाला हजेरी लावतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! जानेवारी 2027 पर्यंत महागाई भत्ता पोहोचणार तब्बल 67 टक्क्यांवर; जाणून घ्या किती होणार फायदा

Jasprit Bumrah Record: भारताचा ‘बूम-बूम’ जलवा! जसप्रीत बुमराहचा महापराक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; असा मान मिळवणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Shocking Video: एका दिवसापूर्वीच राहायला आला, इमारतीच्या 43व्या मजल्यावरुन घेतली उडी, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धडकी भरवणार व्हिडिओ व्हायरल

Sikh Driver Attack: शीख चालकाची दाढी ओढली, डोक्यात वार करुन बस केली हायजॅक! ब्रिटनमधील संतापजनक घटनेनं खळबळ VIDEO

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

SCROLL FOR NEXT