Goa Forward Demands Promotion of Local Cinemas in IFFI Dainik Gomantak
गोवा

52IFFI: पर्रीकरांच्‍या निर्णयाला सावंतांची तिलांजली

माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी कोकणी विशेष विभाग सुरू केला होता. मात्र विद्यमान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्‍याकडून कोकणी चित्रपट संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न होत आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (IFFI) गोव्यातील (Goa) स्थानिक चित्रपटांना प्रोत्साहन देऊन चित्रपट संस्कृती निर्माण करण्यासाठी माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) यांनी कोकणी विशेष विभाग (Konkani Special Department) सुरू केला होता. मात्र विद्यमान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांच्‍याकडून कोकणी चित्रपट संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न होत आहे. या विभागासाठी असलेली किमान चार चित्रपटांची अट रद्द करण्याची मागणी गोवा फॉरवर्डने (Goa Forward Party) केली आहे.

पणजीतील पक्षाच्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना पक्षाचे उपाध्‍यक्ष दुर्गादास कामत म्हणाले की, गेल्या कोरोना महामारीच्या काळात राज्यातील कोकणी चित्रपट दिग्दर्शक व निर्मात्यांना चित्रपट निर्मिती करणे शक्य झाले नाही. यंदाच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी कोकणीचे दोन चित्रपट आहेत. कोकणी विभागासाठी किमान चार चित्रपटांच्या प्रवेशिका आल्यासच हा विभाग असेल अशी अट घालण्यात आली आहे. ही अट गोमंतकीयांवर अन्याय करणारी आहे. राज्यातील कलाकारांना डावलून येथील चित्रपट संस्कृती संपविण्याचा हा डाव असल्याचा आरोप कामत यांनी केला. गोवा मनोरंजन संस्था (ईएसजी) व राज्य सरकारने या निर्णयाचा पुनर्विचार करावा अशी मागणीही त्यांनी केली.

दरवर्षी इफ्फीची सुरुवात कोणत्‍या ना कोणत्‍या वादानेच होते. यावर्षी त्यांनी गोव्यातील कोकणी चित्रपट निर्मात्यांना इफ्फीमध्ये सहभागी होण्यापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. कोरोना काळात कोकणी चित्रपट निर्मात्यांना अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागले. तरीही दोन चित्रपट तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे चार चित्रपटांची नोंदी असतील तरच विशेष कोकणी विभाग आयोजित करण्यात येईल असे म्हणणे चुकीचे आहे. दोन चित्रपटांची निर्मिती करण्यात आली आहे, ते या इफ्फीमध्ये दाखविले नाहीत तर गोव्यावर अन्याय होईल, असे कामत म्हणाले.

पर्रीकरांच्‍या निर्णयाला तिलांजली

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाला प्रादेशिक चित्रपटांचे महत्‍व माहीत नसावे. त्यामुळे सरकारने आपल्या निर्णयावर फेरविचार करावा आणि या दोन चित्रपटांना इफ्फीत प्रदर्शित करण्यासाठी संधी द्यावी. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी कोकणी चित्रपटांसाठी हा विभाग सुरू केल्याने स्थानिक निर्मात्यांना प्रोत्साहन मिळाले. अनेक कलाकार या क्षेत्रात काम करून आपली प्रतिभा दाखवत आहेत, ज्याचा भाजप सरकारला अभिमान वाटला पाहिजे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे त्यांच्याच नेत्याचा इतिहास पुसून टाकण्याचा प्रयत्न करत आहेत, ज्यांनी गोव्यातील चित्रपटसृष्टीच्या हितासाठी निर्णय घेतला होता, असेही कामत म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mark Zuckerberg News: चाइल्ड पोर्नोग्राफी आणि डीपफेक कंटेंटवरुन मोदी सरकार आक्रमक, मार्क जुकरबर्गने मागितली माफी; मेटाच्या अधिकाऱ्यांना पुन्हा समन्स

India vs Sri Lanka: स्वातंत्र्यदिनी टीम इंडिया रचणार इतिहास! अशी कामगिरी करणारा भारत ठरणार जगातील तिसराच; श्रीलंकेत गिल ब्रिगेड करणार कमाल

Navpancham Rajyog 2026: सूर्य-शनिच्या नवपंचम राजयोगानं उजळणार 5 राशींचं भाग्य; धनलाभासह करिअरमध्ये मिळणार प्रचंड यश!

CJP Paper Leak Protest: पेपरफुटीच्या वादात युवाशक्तीचा मोठा विजय! प्रधानांचा राजीनामा अन् मोदी सरकारचा नतमस्तक होणारा पराजय?

Gold Silver Rate: सोन्याचा भाव गगनाला भिडला! 1 लाख 46 हजारांचा टप्पा केला पार, चांदीनेही गाठला नवा उच्चांक; जाणून घ्या आजची किंमत

SCROLL FOR NEXT