Sunith Francis Rodrigues Dainik Gomantak
गोवा

माजी लष्करप्रमुख सुनिथ फ्रान्सिस रॉड्रिग्स कालवश

गेल्या 15 दिवसांपासून पणजीजवळच्या हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते.

दैनिक गोमन्तक

पणजी: माजी लष्कर प्रमुख जनरल (निवृत्त) सुनिथ फ्रान्सिस रॉड्रिग्स यांचे काल शुक्रवारी दुपारी 1.30 वाजता निधन झाले. ते 88 वर्षांचे होते. गेल्या 15 दिवसांपासून पणजीजवळच्या हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांचा जन्म जरी मुंबईत झाला असला तरी त्यांचे वडील फ्रान्सिस हे मूळचे सासष्टी तालुक्यातील कुडतरी गावचे असून आई अस्नोडा येथील आहे. लष्करी सामरिक मार्गदर्शक व विचारवंत म्हणून त्यांची ओळख होती. 1990 ते 1993 दरम्यान ते लष्कर प्रमुख होते.

रॉड्रीग्स हे 2004 ते 2010 दरम्यान पंजाबचे राज्यपालही होते. त्यांच्या निधाननंतर लष्कर प्रमुख जनरल नरवणे यांच्यासह भारतीय लष्कराने त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. संरक्षण रणनीतीकार आणि विचारवंत म्हणून त्यांची ओळख होती. लष्करातून निवृत्त झाल्यानंतर सामाजिक आणि साहित्यिक वर्तुळात ते सक्रिय होते.

या ठिकाणी बजावली सेवा

रॉड्रिग्स 1949 मध्ये भारतीय लष्करी अकादमीच्या संयुक्त सेवा शाखेत सामील झाले आणि 28 डिसेंबर 1952 रोजी आर्टिलरी रेजिमेंटमध्ये नियुक्त झाले. अनेक फील्ड आणि ऑटोमॅटिक आर्टिलरी युनिट्समध्ये सेवा दिल्यानंतर, त्यांनी 1964 मध्ये आर्टिलरी एअर ऑब्झर्व्हेशन पोस्टवर पायलट प्रशिक्षणासाठी अर्ज केला आणि तोफखाना विमानचालन पायलट म्हणून पात्रता प्राप्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Illegal Banners Goa: म्हापशात 'बॅनर पॉलिटिक्स'चा धुरळा! सत्ताधाऱ्यांचे फलक झळकतात, विरोधकांचे बॅनर रातोरात हटवतात

Most Expensive Iphone 18 Pro: आयफोन 18 प्रो चा लक्झरी अवतार, जगातील सर्वात अलिशान स्मार्टफोन लाँच; 'डार्क रेड' मॉडेलचा नवा जलवा

Goa Crime: पेडणे स्मशानभूमीत अज्ञाताचा कुजलेला मृतदेह! 4-5 दिवसांपूर्वी आणून ठेवल्याचा संशय; खुनाच्या शक्यतेने चतुर्थीत खळबळ

Goa Protests: गोव्यात पाच वर्षांत 42 आंदोलने; 2025 मध्ये सर्वाधिक 15! आंदोलनांशी संबंधित गुन्ह्यांत 2024 आघाडीवर, 7 एफआयआर दाखल

VIDEO: हवेतच विमानाचं टायर फुटलं, इंजिनमध्ये घुसले रबराचे तुकडे अन्..., इराणमध्ये बोइंग 737 चं थरारक इमर्जन्सी लँडिंग; व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT