Goa Black Panther Dainik Gomantak
गोवा

Goa Black Panther: ब्लॅक पँथरला बसवणार ट्रॅकिंग डिव्हाईस : राणे

अधिकच्या अभ्यासासाठी कर्नाटकातून बोलवले डॉक्टरांचे पथक

दैनिक गोमन्तक डिजिटल

Tracking Devices to be Placed on Black Panthers in Goa: केपे तालुक्यातील बाळ्ळी येथे लोकवस्तीत फिरणाऱ्या काळ्या बिबट्याला (ब्लॅक पॅंथर) वन विभागाने 1 एप्रिल रोजी पिंजऱ्यात पकडले होते. याचा अधिकचा अभ्यास करण्यासाठी वन विभागाने कर्नाटकातून डॉक्टरांचे पथक बोलवले आहे.

याशिवाय या बिबट्यावर लक्ष ठेवण्यासाठी संपर्क यंत्र (ट्रॅकिंग डिव्हाईस) बसवण्यात येणार आहे, अशी माहिती वनमंत्री विश्वजीत राणे यांनी दिली आहे.

गोव्याच्या जंगलांमध्ये काळ्या बिबट्यांचा वावर होता, हे यापूर्वी वन विभागाने लावलेल्या कॅमेरा ट्रॅपिंगमध्ये सिद्ध झाले होते. आता बाळळी परिसरातील लावण्यात आलेल्या पिंजऱ्यामध्ये हा बिबट्या सापडला आहे.

पहिलाच प्रयोग

राज्यातील वनविभागाने आतापर्यंत अनेक प्रकारचे लोकवस्तीत आलेले प्राणी ,पक्षी,उभयचर प्राणी परत जंगलात सोडले आहेत. मात्र त्यांच्यावरच्या लक्ष ठेवण्यासाठी ट्रॅकिंग डिव्हाईस बसवण्यात आले नव्हते.

वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यामध्ये पहिल्यांदाच काळा बिबट्या सापडला आहे. त्यामुळे वनविभागाच्या दृष्टीने हे नवे आव्हान आहे. म्हणूनच त्याच्यावर लक्ष ठेवण्याकरता हे ट्रॅकिंग डिव्हाईस लावण्यात येत आहे. राज्यातला हा पहिलाच प्रयोग आहे, असे वनविभागाच्या वतीने सांगण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT