Goa Forest Fire Dainik Gomantak
गोवा

Goa Forest Fire: वणव्याबाबत अज्ञातांविरुद्ध 34 तक्रारी; वन खात्याची माहिती

हवामान बदल आगींना कारणीभूत

दैनिक गोमन्तक डिजिटल

Goa Forest Fire: राज्यभरातील वनक्षेत्रातील विविध भागात नोंद झालेल्या वणव्यासंदर्भात वन खात्याने 34 तक्रारी अज्ञात व्यक्तींविरुद्ध दाखल केल्या आहेत. या तक्रारी वन्यजीव संरक्षण, भारतीय वन कायद्याखाली नोंदवण्यात आल्या आहेत.

अनुकूल वातावरण, मागील हंगामातील कमी पाऊस, सामान्यपणे उच्च तापमान, कमी आर्द्रता ही आगीची कारणे असण्याची शक्यता वर्तवली जात आहेत.

मार्चच्या पहिल्या पंधरवड्यात 74 आगीच्या घटनांपैकी 32 घटनांची नोंद तीन वन्यजीव अभयारण्यात नोंदवली गेली आहे.एकूण 418 हेक्टर खासगी जमिनी, राखीव वनक्षेत्र, कोमुनिदाद जमीन व संरक्षित क्षेत्रे या आगीमुळे बाधित झाली आहेत त्यामध्ये 320 हेक्टरपेक्षा अधिक जमीन ही वनक्षेत्रातील आहे.

गोव्यातील अलीकडील जंगलातील आग मुख्यतः कोरड्या सरी, अभूतपूर्व उच्च तापमान व कमी आर्द्रतेमुळे निर्माण झालेल्या अनुकूल वातावरणामुळे असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

मार्चच्या 2023 च्या पहिल्या पंधरवड्यात संपूर्ण गोव्यात खासगी जमिनीत एकूण 74 तुरळक आगीच्या घटना घडल्या आहेत.

इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट 2021अहवालानुसार गोवा राज्यासाठी एकूण नोंद केलेले वनक्षेत्र हे 1271चौ. किलोमीटर इतके आहे जे राज्याच्या भौगोलिक क्षेत्राच्या 34.33 टक्के आहे.

राज्याचे एकूण वनक्षेत्र 2244चौ. किलोमीटर आहे. जे राज्याच्या भौगोलिक क्षेत्राच्या 60.62 टक्के आहे.

आपत्कालीन कृती दल

वनक्षेत्रातील अतिक्रमणे हटवण्यासाठी कायद्याखाली पावले उचलण्यात आली आहेत. गोव्यातील अतिक्रमणाखालील वनक्षेत्र शून्य आहे, मात्र दोन राष्ट्रीय आपत्कालीन कृती दलाचे (एनडीआरएफ) दोन बटालियन्स जंगलातील आगीशी लढण्यासाठी नेहमीच तत्पर ठेवण्यात आल्या आहे. त्यांना त्याचे प्रशिक्षणही देण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT