Mapusa Viral Video Dainik Gomantak
गोवा

Viral Video: टू फॉरेनर्स इन गोवा! म्हापसा येथील 'फ्री बस राईड'चा व्हिडिओ व्हायरल

म्हापसा, गोवा येथून दोन परदेशी नागरिकांचा एक अतरंगी व्हिडिओ समोर आला आहे.

Pramod Yadav

गोव्यात येणारे देशी विदेशी पर्यटक विविध अतरंगी प्रकार करत असतात. त्याचे अनेक व्हिडिओ वेळोवेळी समोर आले आहेत. बऱ्याचवेळा काही पर्यटकांकडून अनुचित प्रकार केले जातात त्याविरोधात पोलिसांनी कारवाई करत असे प्रकार करू नयेत अशी ताकीद देतात.

दरम्यान, म्हापसा, गोवा येथून दोन परदेशी नागरिकांचा एक अतरंगी व्हिडिओ समोर आला आहे.

काय आहे व्हिडिओ?

दोन परदेशी नागरिकांचा हा व्हिडिओ असून, त्यात एक महिला आणि पुरूष परदेशी नागरिक बस पाठिमागे लटकून फ्री प्रवास करताना दिसत आहेत. म्हापसा येथील हा व्हिडिओ असून ती बस देखील खाजगी आहे.

परदेशी नागरिक बसच्या मागे लटकत असताना कोणीतरी हा व्हिडिओ रेकॉर्ड केला असून, सध्या हा व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे.

प्रवासी वाहतूक करणाऱ्या या खासगी बसमध्ये प्रवासी बसलेले दिसत असून, दोघे परदेशी नागरिक बसच्या मागे फ्री राईडचा आनंद घेत आहेत. बसने थोडेच अंतर कापल्यानंतर ते दोघेही खाली उतरतात.

दरम्यान, अशाप्रकारे प्रवास धोकादायक ठरू शकतो त्यामुळे असे प्रकार करू नयेत आणि गोव्यातील वैविध्यपूर्ण पर्यटनाचा आस्वाद पर्यटकांनी घ्यावा अशी प्रतिक्रिया समाज माध्यमातून समोर येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SCROLL FOR NEXT