Bilawal Bhutto India Visit ANI
गोवा

bilawal bhutto india visit : भारतात पोहोचताच बिलावल यांचं पहिलं ट्विट; 'मी गोव्यात आलोय, खूप...'

पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुत्तो दुपारी गोव्यात दाखल झाले आहेत

Rajat Sawant

SCO Summit 2023 : बाणावली येथे आज गुरुवारपासून शांघाय सहकार्य संघटनेची परिषद सुरू आहे. या परिषदेत चीन, पाकिस्तान, रशियासह इतर सदस्य देशांचे परराष्ट्रमंत्री बैठकीला उपस्थित राहणार आहेत. या बैठकीसाठी पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुत्तो गोव्यात दाखल झाले आहेत.

पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुत्तो तब्बल 12 वर्षांच्या कालावधीनंतर भारताला भेट देणारे पहिले परराष्ट्रमंत्री ठरले आहेत. यापूर्वी 2011 मध्ये पाकिस्तानच्या तत्कालीन परराष्ट्रमंत्री हिनी रब्बानी खार भारत भेटीवर आल्या होत्या.

दरम्यान, भारतात पोहोचताच बिलावल यांनी पहिलं ट्विट केले आहे. "शांघाय सहकार्य संघटनेची परिषदेच्या निमित्ताने मी गोव्यात आलोय. मी पहिल्यांदा रुस देशाच्या परराष्ट्रमंत्र्यांशी चर्चा करणार आहे. त्यानंतर मी उझबेकिस्तान देशाच्या परराष्ट्रमंत्र्यांशी चर्चा करणार आहे. यानंतर परिषदेत सहभागी सर्व परराष्ट्रमंत्र्यांसोबत मी भोजनाचा आस्वाद घेईन तसेच मुलाखतीही देणार आहे." अशी माहिती त्यांनी व्हिडीओ ट्विट करत दिली.

सर्वांचे लक्ष भारत-पाकिस्तानच्या बैठकीवर आहे. तब्बल 12 वर्षांच्या कालावधीनंतर भारताला भेट देणारे बिलावल भुत्तो पहिले परराष्ट्रमंत्री ठरले आहेत. यापूर्वी 2011 मध्ये पाकिस्तानच्या तत्कालीन परराष्ट्रमंत्री हिनी रब्बानी खार भारत भेटीवर आल्या होत्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! जानेवारी 2027 पर्यंत महागाई भत्ता पोहोचणार तब्बल 67 टक्क्यांवर; जाणून घ्या किती होणार फायदा

Jasprit Bumrah Record: भारताचा ‘बूम-बूम’ जलवा! जसप्रीत बुमराहचा महापराक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; असा मान मिळवणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Shocking Video: एका दिवसापूर्वीच राहायला आला, इमारतीच्या 43व्या मजल्यावरुन घेतली उडी, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धडकी भरवणार व्हिडिओ व्हायरल

Sikh Driver Attack: शीख चालकाची दाढी ओढली, डोक्यात वार करुन बस केली हायजॅक! ब्रिटनमधील संतापजनक घटनेनं खळबळ VIDEO

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

SCROLL FOR NEXT