Tourist Places In India Dainik Gomantak
गोवा

Tourist Places In India: भारतीयांची गोव्यालाच पसंती; फिरायला जाण्यासाठी देशातील लोक काय सर्च करताहेत?

दुबईला सर्वात लोकप्रिय आंतरराष्ट्रीय ठिकाण म्हणून पसंती दिली जात आहे.

Pramod Yadav

Tourist Places In India: उन्हाळा सुरू होत आहे, सुट्यांचा काळ जवळ आला आहे. या काळात देशातील विविध ठिकाणी लोक फिरायला जात असतात. दरम्यान, देशांतर्गत फिरण्यासाठी भारतीय गोव्यालाच सर्वाधिक पसंती देत आहेत.

तर दुबईला सर्वात लोकप्रिय आंतरराष्ट्रीय ठिकाण म्हणून पसंती दिली जात आहे.

डिजिटल ट्रॅव्हल प्लॅटफॉर्म अगोदावरील शोध डेटाच्या आधारावर ही माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. गोवा, नवी दिल्ली आणि एनसीआर, मुंबई, पाँडिचेरी आणि जयपूर ही राज्ये/शहरे शीर्ष पाच आवडती राष्ट्रीय शहरे म्हणून दाखविण्यात आली.

तर दुबई, सिंगापूर, मालदीव, बाली (इंडोनेशिया) आणि फुकेत (थायलंड) आंतरराष्ट्रीय विभागातील शोध चार्टमध्ये आघाडीवर आहेत.

दुबई व्यतिरिक्त दक्षिणपूर्व आशियाई देशांना भारतीय लोक आंतरराष्ट्रीय सुट्टीसाठी प्राधान्य देतात. उष्णकटिबंधीय हवामान, समुद्रकिनारे आणि विविध प्रकारचे निवासस्थान यामुळे या ठिकाणांना पसंती दिली जात आहे.

गोवा प्रसिद्ध आणि मनमोहक समुद्रकिनाऱ्यांसाठी ओळखला जातो. तसेच, नवी दिल्ली एनसीआर आणि मुंबई येथे प्रसिद्ध प्रेक्षणीय स्थळे आहेत. आणि पाँडिचेरीमध्ये विविध सौंदर्यस्थळे प्रसिद्ध आहेत आणि जयपूरचा समृद्ध इतिहास आणि संस्कृती अनेकांना आकर्षित करते.

Agoda ने केलेल्या फॅमिली ट्रॅव्हल ट्रेंड सर्वेक्षणाच्या निष्कर्षावर ही माहिती आधारीत आहे. यासाठी जगभरातील 12 ठिकाणावरील 14,000 कौटुंबिक प्रवाशांचे सर्वेक्षण करण्यात आले.

"कुटुंब सहलींना अधिक पसंती देतात याचा उद्देश एकत्र दर्जेदार वेळ घालवणे आणि सुट्ट्यांचा फायदा घेणे असा असतो. परदेशात प्रवास करताना भारतीय नागरीक समुद्रकिनाऱ्याची ठिकाणे निवडतात, असे Agodaच्या डेटावरून दिसून येते.

भारतीय नागरिक प्रसिद्ध आणि प्रेक्षणीय स्थळांना भेट द्यालया प्राधान्य देतात. त्यानंतर मनमोहक समुद्रकिनारे आणि थीम आणि पार्क यांना भेट द्यायला पसंती देतात असेही Agoda चा डेटा दाखवतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT