Goenchea Ramponkarancho Ekvott Dainik Gomantak
गोवा

Fishing In Goa: ‘एलईडी’ मासेमारीवर बंदी घाला!

Goenchea Ramponkarancho Ekvott: सागरी संपदा आणि मच्छीमारांचे रक्षण करण्यात अपयशी ठरल्याबद्दल मत्स्यव्यवसाय विभाग संचालक डॉ. शमिला मोन्तेरो यांच्यावर ताशेरे ओढले

गोमन्तक डिजिटल टीम

वास्को: गोव्यातील सागरी संपदा आणि मच्छीमारांचे रक्षण करण्यात अपयशी ठरल्याबद्दल ‘गोंयचो रापोणकारांचो एकवोट’ संघटनेने मत्स्यव्यवसाय विभाग आणि संचालक डॉ. शमिला मोन्तेरो यांच्यावर ताशेरे ओढले. तसेच ‘एलईडी’ पद्धतीने मासेमारीवर करण्यावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली.

पत्रकार परिषदेत संघटनेचे सरचिटणीस ओलेन्सिओ सिमॉईस, उपाध्यक्ष कॅमिलो सौझा, किस्तोद डिसोझा व इतर सदस्य उपस्थित होते.

मासेमारीचा नवीन हंगाम सुरू होत असून एलईडी मासेमारीवर बंदी घालावी आणि गोव्याच्या हद्दीत प्रवेश करणाऱ्या सर्व बोटी जप्त कराव्यात. असे न केल्यास राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची बिकट स्थिती निर्माण होईल. हा विभाग आता गोव्यातील सागरी संसाधने आणि मच्छीमारांना नष्ट करण्यासाठी एजंटसारखे वागत आहे, असा ठपका ठेवण्यात आला.

सिमाॅईस म्हणाले की, सर्व विनाशकारी ट्रॉलर्सच्या वापरावर बंदी घालणारे गोवा हे पहिले राज्य आहे; परंतु बंदी लागू करणारे ते शेवटचे राज्य आहे. श्रीलंकेत अशा विध्वंसक उपकरणांच्या वापरामुळे मच्छीमार विस्थापित झाले असून इतर देशांमध्येही हीच स्थिती आहे. राज्यभरातील मच्छीमारांची दयनीय स्थिती पाहता मान्सून बंदी ९० दिवसांपर्यंत वाढवण्याची मागणी सिमाॅईस यांनी केली.

कायदा असूनही अंमलबजावणी नाही

२०१६ पासून एलईडी लाईट फिशिंगचे सतत उल्लंघन होत आहे. जनरेटरची शक्ती ४० केव्हीवरून आता १७० केव्हीपर्यंत वाढली आहे. तसेच प्रखर बल्ब वापरले जातात. एलईडी दिव्यांवर बंदी घालण्यासाठी कायदा मंजूर करण्यात आला खरा. परंतु एलईडी पद्धतीने मासेमारी किंवा बूल ट्रॉलिंगसारख्या पद्धतींना आळा घालण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे हे खेदजनक आहे, असे सौझा यांनी नमूद केले.

अर्थसंकल्पात मच्छीमारांना ‘ठेंगा’

कॅमिलो सौझा म्हणाले की, यावर्षी अर्थसंकल्पात ८४.०३ कोटींची तरतूद मत्स्य व्यवसायासाठी केली आहे. मात्र, त्यात गोव्यातील मच्छीमारांसाठी एक रुपयाही नाही. विनाशकारी ट्रॉलर्सवर बंदी लागू करण्यात मत्स्य विभागाला अपयश येत असल्यामुळे अनेक मच्छीमार विस्थापित होत आहेत. त्यातच मासेमारीचा खर्च वाढत चालल्याने काहीजण इतर व्यवसायांकडे वळत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT