Food Street Dainik Gomantak
गोवा

Food Street : वाळपईत साकारणार फूड स्ट्रीट आता नव्या ढंगात ! दुकानांची रचना बदलणार

Food Street : ‘जी- सुडा’तर्फे ७८ लाख खर्चून प्रकल्प

गोमन्तक डिजिटल टीम

Food Street : वाळपई, आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्या प्रयत्नाने राज्यात झपाट्याने विविध विकासकामे मार्गी लागत आहेत. आरोग्याच्या बाबतीत असो किंवा वाळपई नगरपालिका मैदान, मासोर्डे येथील फुटसाल मैदान वा नाणूस येथे काम सुरु असलेले मैदान, गार्डन आदी प्रकल्पांमुळे वाळपईचा दोन वर्षांपासून चेहरा मोहराच बदलत आहे.

‘फूड स्ट्रीट’ही दुकानांची रचना बदलून नव्या ढंगात येणार आहे. ‘जी- सुडा’तर्फे ही सर्व कामे मार्गी लागत आहेत. या प्रमाणेच आता वाळपई पालिकेच्या मार्केट संकुलचे सौंदर्यीकरण होणार आहे.

फूड स्ट्रीटसाठी दीड कोटी मंजूर

राष्ट्रीय आरोग्य अभियानंतर्गत वाळपई येथे ७८. ९७ लाख रुपये खर्चून फूड स्ट्रीट आणि मुरगाव येथे ७८.७३ लाख रुपये खर्चून फूड स्ट्रीट विकसित करण्यात येणार आहे. राज्य नागरी विकास संस्थेने या प्रकल्पांसाठी निविदा मागविल्या व त्याला मंजुरी मिळालेली आहे.

वडापाव गाडे स्थलांतर सुरू

दरम्यान,बुधवारपासून नगरपालिकेच्या परिसरात असलेल्या वडापावचे गाडे काढण्याचा आदेश पालिकेने दिला आहे. सध्याच्या परिसराचे सौंदर्यीकरण होणार असल्याने प्रकल्पाचे काम पूर्ण होत नाही. तोपर्यंत व्यावसायिकांना पर्यायी जागा दिली जाणार आहे.

वाळपईला लवकर शहराचा दर्जा मिळणार आहे. त्यासाठी मुंबईच्या धर्तीवर वाळपईत सर्व सुविधा वाळपईत मिळणार आहे. मुंबई सारख्या शहरात असलेले फूड स्ट्रीट राज्यात यावे यासाठी आपले प्रयत्न होते. त्यामुळे राज्यात एक मुरगाव व तर दुसरा वाळपईत प्रकल्प होणार आहे.

- विश्वजित राणे,आरोग्यमंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

Goa Agriculture: कोकमला अवकाळी पावसाचा फटका, लागवड क्षेत्रात सातत्याने वाढ; हवामान बदलाने उत्पादनात चढ-उतार

Goa Weather: गोव्यात उन्हाचा तडाखा अन् सत्तरी-साखळीत वादळी पाऊस; पुढील 4-5 दिवस उष्मा कायम राहणार

Tourist Safety: दलालांवर 'ड्रोन'ची नजर, एआयने आवळणार फास; 'बीच व्हिजिल ॲप'ही होणार अपग्रेडच, पर्यटनमंत्र्यांची माहिती

VIDEO: कदंब कर्मचाऱ्यांवर कोयता घेऊन धावला; हल्ल्याच्या प्रयत्नानंतर रिवे मार्गावरील बससेवा दोन दिवसांपासून बंद

SCROLL FOR NEXT