Goa Express Dainik Gomantak
गोवा

Goa Express: गोवा एक्सप्रेसमधील 8 प्रवाशांना अन्नातून विषबाधा? बेळगाव जिल्हा रूग्णालयात उपचार सुरु

तब्येत खालवलेल्या महिला आणि पुरुष प्रवाशांना रात्री बेळगावच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Pramod Yadav

Goa Express: गोवा एक्सप्रेसमधील आठ प्रवाशांची तब्येत अचानक खराब झाल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी रात्री उघडकीस आला. प्रवाशांना अन्नातून विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त केला जात असून, त्यांना उपचारासाठी बेळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उपचाराधीन प्रवाशांमध्ये महिला आणि पुरुषांचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गोव्यातील वास्को-द-गामा ते दिल्लीच्या हजरत निजामुद्दीन मार्गावर धावणाऱ्या गोवा एक्स्प्रेस ट्रेनमध्ये आठ प्रवाशांना अन्नातून विषबाधा झाल्यासारखी लक्षणे आढळून आली. प्रवासात अचानक त्रास होऊ लागल्याने महिला आणि पुरुष प्रवाशांना रात्री बेळगावच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

सर्व प्रवाशी खांडवा, मध्य प्रदेश येथील रहिवाशी असल्याची माहिती समोर आली आहे. प्रवाशांना त्रास होत असल्याचे लक्षात येताच सहप्रवाशांनी रेल्वे पोलिसांनी याची माहिती दिली, त्यानंतर पोलिसांनी बेळगाव येथे ट्रेन थांबवली.

प्रवाशांचे साहित्य चोरी करण्याच्या उद्देशाने कोणीतरी त्यांना संशयास्पद पदार्थ खाण्यास दिले असा संशय व्यक्त केला जात आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अन्नाचे नमूने तपासणीसाठी पाठवले असल्याचे म्हटले आहे. तपासणी अहवाल समोर आल्यानंतर त्यांना नक्की कशामुळे त्रास झाला याची माहिती मिळेल असे डॉक्टरांनी म्हटले आहे.

तसेच, प्रवाशांनी सोबत आणलेले पदार्थच खाल्ले होते त्यांनी दुसरे काही मागविले नाही. असेही सांगितले जात आहे. दरम्यान, याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. पोलिसांनी प्रवाशांच्या नातेवाईकांना याबाबत माहिती दिली असून, अधिक तपास पोलीस करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT