Bicholim News Dainik Gomantak
गोवा

Bicholim News : डिचोली बाजारात साकारणार ‘फूड कोर्ट’; नगरपालिकेचा प्रस्ताव

खवय्यांना दिलासा मिळणार

गोमन्तक डिजिटल टीम

Bicholim : शहरात ''फूड कोर्ट'' साकारण्याचा डिचोली पालिकेचा प्रस्ताव असून हा प्रस्ताव प्रत्यक्षात आल्यानंतर खवय्यांसाठी ते सोयीस्कर आणि एक प्रकारे मेजवानी ठरणार आहे. खवय्यांना त्यांच्या आवडीचे खाद्यपदार्थ एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. शहरातील बाजार संकुल आणि मासळी मार्केटजवळील पत्र्यांचे गाडे काढल्याने मोकळ्या झालेल्या जागेत नियोजित ''फूड कोर्ट'' साकारण्याचा प्रस्ताव पालिकेने विचारात घेतला आहे.

शहरातील विविध ठिकाणी धंदा करणारे वडापाव, भेळपुरी आणि अन्य खाद्यपदार्थ्यांचे हातगाडेही आता बाजार संकुल आणि मासळी मार्केटजवळील मोकळ्या जागेत स्थलांतरित करण्यात आले आहेत.

सर्व हातगाडे एकाच ठिकाणी आणल्यानंतर त्या ठिकाणी वीज आदी आवश्यक साधनसुविधा उभारण्यात येणार आहेत. पालिकेकडून ही माहिती मिळाली आहे. सध्या अठरा हातगाडे एकाच ठिकाणी आणण्यात आले आहेत.

डिचोली शहरात वडापाव, भेळपुरी आदी खाद्यपदार्थ्यांच्या हातगाड्यांची संख्या वाढली आहे. सायंकाळी ते रात्री उशिरापर्यंत बाजारासह शहरातील विविध भागात या हातगाड्यांवरून व्यवसाय चालत असे.

हातगाड्यांचे स्थलांतर

काही हातगाडे रहदारीस अडथळा ठरत होते. या हातगाड्यांविरोधात तक्रारीही वाढत होत्या. त्यामुळेच शहरात विविध ठिकाणी व्यवसाय करणारे हातगाडे तेथून हटविण्याचा निर्णय घेण्यात आला.

त्यानुसार आतापर्यंत सोळाहून अधिक हातगाडे पूर्वीच्या ठिकाणावरून हटवून मासळी मार्केटजवळील मोकळ्या जागेत स्थलांतरित करण्यात आले आहेत, अशी माहिती मुख्याधिकारी सचिन देसाई यांनी दिली.

ज्याठिकाणी भेळपुरी आणि वडापावच्या गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे, तो परिसर ''फूड कोर्ट'' करण्याचा विचार आहे. फूड कोर्ट केल्यास गाडेधारकांना त्याचा फायदा होणार आहे. या प्रस्तावाबाबत पालिका मंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात येणार आहे. रात्रीच्यावेळी या गाडेधारकांना सुरळीतपणे धंदा करता यावा. यासाठी या परिसरात विजेची सोय करण्यात येणार आहे,.

कुंदन फळारी, नगराध्यक्ष.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT