Following Sunday night violence, Vasco DySP Salim Shaikh and PI Nitin Halarnkar transferred to Government Railway Police Dainik Gomantak
गोवा

पोलीस उपअधीक्षक आणि निरीक्षकांची तडकाफडकी बदली

त्यांच्याजागी उपअधीक्षक नीलेश राणे आणि निरीक्षक कपिल नायक यांची नियुक्ती

दैनिक गोमन्तक

मडगाव : रामनवमीच्या शोभायात्रेवर दगडफेक केल्यानंतर झालेल्या तणावाची स्थिती सक्षमरीत्या हाताळण्यास अपयश आल्याबद्दल मुरगावचे उपअधीक्षक सलीम शेख आणि वास्को पोलीस स्थानकाचे निरीक्षक नितीन हलर्णकर यांची तडकाफडकी गोवा (goa) राखीव पोलीस दलात बदली करण्यात आली आहे.

पोलीस मुख्यालय अधीक्षक शेखर प्रभुदेसाई यांनी आज जारी केलेल्या आदेशात त्यांच्या जागेवर उपअधीक्षक निलेश राणे आणि निरीक्षक कपिल नायक याना रुजू होण्याचे आदेश दिले आहेत.

वास्कोतील (Vasco) रविवारच्या रथयात्रेवर झालेल्या दगडफेकीच्या घटनेनंतर वास्कोचे पोलीस (police) उपअधीक्षक सलीम शेख व निरीक्षक नितीन हळर्णकर या दोघांना तत्काळ राखीव दलात हजेरी लावण्याचा बिनतारी संदेश देण्यात आला होता. त्यांच्याजागी उपअधीक्षक नीलेश राणे आणि निरीक्षक कपिल नायक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

दरम्यान, तीन वर्षांनी मयेतील श्री माया केळबाय देवस्थानची प्रसिद्ध ‘माल्याची जत्रा’ साजरी झाली खरी, मात्र या जत्रेतील प्रमुख वैशिष्ट्य असलेले ‘माले’ मात्र अखेरपर्यंत पेटले नाही. अधिकारावरून वाद निर्माण झाल्याने शेवटपर्यंत माले मंदिराबाहेर काढण्यात आले नाही. माले पेटले नसल्याने देवीचा ‘पण’ अपूर्ण तर राहिलाच, उलट माले नृत्याचा दैवी चमत्कार अनुभवण्यासाठी आलेल्या हजारो भक्तांचा भ्रमनिरास झाला. दुसऱ्या बाजूने काही पारंपरिक रितिरिवाजांना फाटा देत मये गावात वास्त्यव्यासाठी आलेल्या मुळगावच्या श्री केळबाई देवीची पेठचे मध्यरात्री मुळगावला प्रयाण झाले. तर आज (रविवारी) पहाटे मयेतील पेठ केळबाय देवीच्या मंदिरात नेण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT