Margao Street food hub  Dainik Gomantak
गोवा

'नियम पाळा अन्यथा कारवाईला सामोरे जा'

मडगाव पालिका: ‘फास्ट फूड’ व्यावसायिकांना इशारा

दैनिक गोमन्तक

मडगाव: शहराच्या विविध भागात कार्यरत असलेल्या फास्ट फूडवाल्यांबाबतच्या तक्रारींची गंभीरपणे दखल घेऊन मडगाव पालिकेने त्यांना स्वच्छतेसह नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करा अन्यथा, कारवाईस सामोरे जावे लागेल, असे बजावले आहे.

('Follow the rules or face action', warns Madgaon Municipality)

पालिका मुख्याधिकारी रोहित कदम यांनी बुधवारी सायंकाळी स्वच्छता निरीक्षक विराज आरांबेकर व संजय सांगेलकर यांच्या समवेत जुन्या बसस्थानकावर जाऊन तेथील फास्ट फूड व्यवहाराची पहाणी केली व नंतर या सूचना दिल्या. यावेळी नगरसेवक जॉन आल्वारिस व माजी नगरसेवक राजेंद्र आजगावकर हेही उपस्थित होते.

पहाणीनंतर कदम यांनी फास्ट फूडवाल्यांना त्यांनी सर्वत्र परिसर अस्वच्छ करू नये,व्यवसायानंतर गाडे तेथून हटवावेत, तो भाग आरोग्यदायी ठेवावा, तयार होणारा कचरा वेगवेगळा करून व्यवस्थित ठेवावा, वगैरे सूचना केल्या व नियमांचे उल्लंघन झाल्यास पाच हजारांचा दंड पडेल या बाबत इशारा दिला.

विराज आरांबेकर यांनी त्यांना सदर ठिकाणी शीतपेय विकता येणार नाही, सामान घेऊन रिक्षा आणता येणार नाही,पाणी साठवून ठेवता येणार नाही, की गटारात सांडपाणी टाकता येणार नाही, अशा सूचना केल्या. त्या न पाळणाऱ्यांना ओढून नेण्याचा इशाराही त्यांनी दिला.

नंतर मुख्याधिकारी पत्रकारांशी बोलताना म्हणाले की मडगाव पालिकेचा हेतू कोणाला सतावण्याचा नाही तर लोकांना आरोग्यदायी अन्नपदार्थ मिळावेत हा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT