Fly 91  Dainik Gomantak
गोवा

हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी एक कंपनी; गोवा, सिंधुदुर्ग, नांदेड, पुणे विमानसेवा सुरू होणार

रिजनल कनेक्टेव्हीटी स्किम अंतर्गत उडान 5.0 मार्गांची घोषणा करण्यात आली आहे.

Pramod Yadav

राकेश झुनझुनवाला यांची मुख्य भागिदारी असलेल्या 'अकासा एयरलाईन्स'ची मागील काही महिन्यापूर्वी हवाई वाहतूक क्षेत्रात एन्ट्री झाली. कंपनीने सुरूवातीला देशांतर्गत विमान वाहतूकीला सुरूवात केली आहे. त्यानंतर आता आणखी एक नवी कंपनी हवाई वाहतूक क्षेत्रात दाखल झाली आहे.

फ्लाई-91 असे या कंपनीचे नाव असून, कंपनी सुरूवातीला मर्यादीत ठिकाणांवर वाहतूक सुविधा पुरवणार आहे.

रिजनल कनेक्टेव्हीटी स्किम अंतर्गत उडान 5.0 मार्गांची घोषणा करण्यात आली आहे. सरकारकडून सर्व परवानग्या मिळाल्यानंतर ऑक्टोंबर- नोव्हेंबरपासून कंपनी प्रवासी सेवा सुरू करण्याची शक्यता आहे. सुरूवातीला चिपी, सिंधुदुर्ग, जळगाव, नांदेड व अगाती (लक्षद्वीप) या ठिकाणांहून गोवा, पुणे, बेंगलोर व हैद्राबाद या शहरांकरिता प्रवासी विमानसेवा सुरू केली जाणार आहे.

विशेष बाब म्हणजे कंपनीचा मुख्य कार्यालय किंवा हब गोव्यातील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे असणार आहे. विमानांचे सर्व्हिसिंग व प्रशासकीय सेवा येथूनच नियंत्रित केल्या जातील.

फ्लाई-91 विमान सेवांची दोन प्रकारात विभागणी करण्यात आली आहे. यात 20 ते 80 आसनी आणि 80 आसनांपेक्षा जास्त क्षमतेची विमानसेवा अशी विभागणी असेल. विमानसेवेसाठी कंपनीने 200 कोटींची गुंतवणूक केल्याची माहिती समोर आली आहे. कंपनीच्या ताफ्यात ATR 72 प्रकारातील विमाने असतील.

फ्लाई-91 या नव्या विमानसेवेमुळे देशांतर्गत कनेक्टिव्हीटी वाढण्यास मदत होणार आहे. तसेच, यामुळे प्रवासाचा वेळ देखील वाचणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Illegal Banners Goa: म्हापशात 'बॅनर पॉलिटिक्स'चा धुरळा! सत्ताधाऱ्यांचे फलक झळकतात, विरोधकांचे बॅनर रातोरात हटवतात

Most Expensive Iphone 18 Pro: आयफोन 18 प्रो चा लक्झरी अवतार, जगातील सर्वात अलिशान स्मार्टफोन लाँच; 'डार्क रेड' मॉडेलचा नवा जलवा

Goa Crime: पेडणे स्मशानभूमीत अज्ञाताचा कुजलेला मृतदेह! 4-5 दिवसांपूर्वी आणून ठेवल्याचा संशय; खुनाच्या शक्यतेने चतुर्थीत खळबळ

Goa Protests: गोव्यात पाच वर्षांत 42 आंदोलने; 2025 मध्ये सर्वाधिक 15! आंदोलनांशी संबंधित गुन्ह्यांत 2024 आघाडीवर, 7 एफआयआर दाखल

VIDEO: हवेतच विमानाचं टायर फुटलं, इंजिनमध्ये घुसले रबराचे तुकडे अन्..., इराणमध्ये बोइंग 737 चं थरारक इमर्जन्सी लँडिंग; व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT