Ponda Dabal Road Flood Dainik Gomantak
गोवा

Ponda News: तब्बल २० तास वाहतूक ठप्‍प; फोंडा-दाबाळ मार्ग

Goa Rain: सर्व वाहतूक धारबांदोडा मार्गाने वळविण्यात आली

गोमन्तक डिजिटल टीम

निरंकाल-फोंडा येथील उन्नयी नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने फोंडा - दाबाळ मार्गावरील वाहतूक सुमारे २० तास ठप्प झाली. त्यामुळे सर्व वाहतूक धारबांदोडा मार्गाने वळविण्यात आली. तर, धारबांदोडा पंचायत क्षेत्रातील दावकोण गावात जाणारा रस्ता रविवारी संध्याकाळी ते सोमवारी सकाळपर्यंत पाण्याखाली गेला होता. काल दुपारी पाणी ओसरल्यानंतर तो वाहतुकीस खुला झाला.

निरंकाल येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही रस्ता पाण्याखाली गेला. इनासिन आझावेदो यांच्या कुळागारात पाणी भरल्याने केळी तसेच सुपारीच्‍या झाडांची पडझड झाली. कुळागारात पडलेले नारळ, सुपारी वाहून गेल्याने त्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सोसावे लागले.

धावकोण गावातून दूधसागर नदी वाहते. गेल्‍या रविवारी संध्याकाळी दूधसागर नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने धावकोण रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला. दरम्‍यान, कुळे पोलिस निरीक्षक सगुण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पथक येथील येथील स्थितीवर लक्ष ठेवून आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Women’s Asia Cup 2026: मैदानावर पुन्हा रंगणार भारत-पाक थरार! टीम इंडियाच्या वाघिणी सज्ज; मॅचची तारीख, वेळ आणि थेट प्रक्षेपणाचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर

VIDEO: 'नेपाळमध्ये जलतांडव होईल, घरं पाण्यात बुडतील...' दोन महिन्यांपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल; पाद्रीनं आधीच दिली होती संकटाची चाहूल

Unicef Child Safety Report: 1 वर्षात 2 कोटी मुले ठरली ऑनलाईन लैंगिक शोषणाची शिकार, युनिसेफच्या रिपोर्टनं खळबळ; धक्कादायक वास्तव आलं समोर

Goa Crime: लग्नाचे वचन, शारीरिक संबंध अन् 18 लाखांच्या फसवणूकीचा आरोप; ठोस पुराव्याअभावी संशयिताची निर्दोष सुटका

Electric Shock Death: विहिरीतील पंप तपासण्यासाठी गेला अन्... विजेचा धक्का बसून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू, सातोर्ली-गावडोंगरी येथील घटना

SCROLL FOR NEXT