गोव्यात (Goa rains) आणि कोकणात (Konkan floods) उद्भवलेला पूर हा मानवनिर्मित आहे, असा दावा पर्यावरण अभ्यासकांनी केला आहे. (Flash floods in Goa and Konkan are man-made, according to experts)
पाणलोट आणि खारफुटीच्या क्षेत्राचे संरक्षण करण्यात झालेले दुर्लक्ष, अपरिमित वाळू उपसा, खाण व्यवसाय आणि नदी-नाल्यातील अतिक्रमण तसेच वाढते काँक्रीटीकरण यामुळे पुराचा धोका वाढत आहे, असे पर्यावरण अभ्यासकांचे मत आहे.
नद्यांवर होणारे अतिक्रमण हे पूरस्थिती उद्भवण्याचे प्रमुख कारण असल्याचा मुद्दा पर्यावरण अभ्यासक राजेंद्र केरकर यांनी मांडला आहे. त्यालाच अनुसरून संशोधक डॉ. नंदकुमार कामत म्हणतात, निसर्गाला पूर प्रिय आहे आणि मानवाला त्याबद्दल द्वेष आहे. पण आपण पाणी जिरवण्यासाठी काहीच उपाययोजना करणार नसू तर अशा कहराचा सामना करावाच लागेल. पुरासंदर्भात पर्यावरण संवर्धन क्षेत्रात कार्य करणारे कार्यकर्ते मधू गावकर यांनी स्पष्ट केले की, म्हादई आणि तिळारी खो-यात प्रचंड वृक्षतोड झाली आहे, परिणामी गाळाचा भार वाढून पुराची समस्या उद्भवत आहे.
यापूर्वी १९८२, १९८८, १९९९, २००० आणि २००९ तसेच २०१९ सालीही पुराच्या घटना घडल्या आहेत. त्यावेळीही प्रचंड हानी सहन करावी लागली. पण, पुराचा इतिहास पाहता अशी हानी संभवली नव्हती. त्यांच्यामते बदललेली शासकीय धोरणे पूरस्थितीला कारणीभूत आहेत. याबाबत ज्येष्ठ संशोधक डॉ. नंदकुमार कामत यांनी उपस्थित केलेला प्रश्न विचारात घेण्यासारखा आहे.
३० वर्षांपासून राज्यात ही स्थिती उद्भवत असता राज्य सरकारने ७३ आणि ७४ वी घटना दुरुस्ती का केली नाही, असा प्रश्न आहे. या एकूण परिस्थितीबाबत अनेक मतमतांतरे असली तरी, राज्यातील पूरस्थिती ही मानवनिर्मित असल्याबद्दल बहुतेकांचे एकमत आहे.विकासाला कुणाचीच हरकत नाही. पण, निसर्गावर अतिक्रमण केल्यास असे प्रसंग उद्भवतील. मोठ्या प्रमाणात होणारी वृक्षतोड आणि निसर्गाची हानी यामुळे पूरस्थिती निर्माण होत आहे. त्याबाबत वेळीच उपाययोजना न आखल्यास भविष्य भयानक असेल, असं पर्यावरण अभ्यासक राजेंद्र केरकर म्हणतात.
उदय प्रभुदेसाई, कृषी अभ्यासक यांच्या मते, आपत्ती केवळ मानव निर्मित आहे, असे म्हणता येणार नाही. शासनाचे अयोग्य नियोजनदेखील त्याला कारणीभूत आहे. कोणत्या धरणातून पाणी सोडले जाणार याची पूर्वकल्पना कुणालाच नसते. परिणामी, सतर्कता बाळगण्यास संधी मिळत नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.