Leo Rodrigues Dainik Gomantak
गोवा

Mormugao: भारत इतर राष्ट्रांसह जगात नावलौकीक करतो आहे - लिओ रॉड्रीगीस

मुरगावचे नगराध्यक्ष लिओ रॉड्रीगीस यांच्या हस्ते ध्वजारोहन

दैनिक गोमन्तक

वास्को: "अमृत महोत्सवी वर्षात " भारत देशाने कृषी, पर्यावरण, शिक्षणासह इतर क्षेत्रात प्रगती करून जगात नावलौकीक प्राप्त करीत आहे. भारत इतर राष्ट्रांसह अन्य क्षेत्रात अग्रेसर आहे. हेच ध्येय आजच्या युवा पिढीने आचरणात आणून स्वातंत्र्याच्या 'अमृत महोत्सवी वर्षा' निमित्त आपले कार्य देश हितासाठी असावे, असे आवाहन मुरगाव तालुक्याचे प्रथम नागरिक नगराध्यक्ष लिओ रॉड्रीगीस यांनी केले.

(Flag hoisting by Mayor Leo Rodrigues of Mormugao)

मुरगाव नगरपालिके तर्फे 15 ऑगस्ट 20222 देशाचे ' अमृत महोत्सवी वर्ष ' साजरे करण्यात आले. प्रमुख पाहुणे मुरगावचे नगराध्यक्ष लिओ रॉड्रीगीस यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. यावेळी त्याच्या समवेत मुरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी जयंत तारी, उपनगराध्यक्ष म्यूनिसिपल विद्यालय मुख्याध्यापिका वेलेन्टीना बारॅटो, पालिकेचे प्रशासकीय अधिकारी, कामगार, विद्यालयाचे विद्यार्थी, शिक्षक, पालक, माजी नगराध्यक्षा तारा केरकर, माजी उपनगराध्यक्षा लविना डिसोझा, माजी उपनगराध्यक्षा रिमा सोनुर्लेकर,जेष्ठ नागरीक बाबूराव रेडकर व इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढे बोलताना नगराध्यक्ष रॉड्रीगीस म्हणाले कि, शालेय विद्यार्थानी शिक्षका बरोबर पालकांचा आदर राखावा. राज्याच्या विकासात हेच विद्यार्थी भविष्यात पुढाकार घेऊन देशाचा गौरव वाढवतील. शालेय विद्यार्थानी पालिका, पंचायतीच्या ' स्वच्छ भारत अभियानात आपला सहभाग दाखवून स्वच्छता मोहीम पुढे न्यावी. तसेच राज्य गृह विभागाच्या वाहतुक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले.

या कार्यक्रमात म्यूनिसिपलची स्कूलची विद्यार्थीनी सुमिधा गावस यांने देशभक्तीवर आपले भाषण केले. तसेच विद्यार्थानी पुलवामा हल्यातील शहीदांना नाट्य रूपातंरात आदरांजली वाहीली. यावेळी उपनगराध्यक्ष अमय चोपडेकर, नगरसेवक दिपक नाईक यांची समयोचीत भाषण झाले. संपूर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शिक्षिका साक्षी परब तर आभार प्रदर्शन मुख्याधिपिका वेलेन्टीना बारॅटो यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Bike Stunt Video: काळजाचं पाणी करणारा थरारक स्टंट! पठ्ठ्याचा डोकं चक्रावणारा व्हिडिओ व्हायरल; जीवाची लावली बाजी

Shani Gochar 2026: शनिदेव देणार 5 राशींना श्रीमंतीचं वरदान! हाती लागणार कुबेराचा खजिना; करिअरला मिळणार नवा बूस्ट

Colvale Jail Employee Stress: अभद्र युतीमुळे प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा गुदमरतोय जीव! सुधारगृह गुन्हेगारांचा अड्डा; मानसिक आरोग्य कक्ष व छळविरोधी समित्यांची तातडीची मागणी

Crime News: आधी विषारी कोल्ड्रिंक पाजले, मग गळा आवळून केला खून! 20 वर्षांच्या संसारानंतर बायकोनेच नवऱ्याचा काढला काटा; कारण ऐकून व्हाल अवाक

Jitesh Kamat Colvale Jai: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाची सद्यस्थिती पाहता, 'गुन्हेगारांना आलिशान सुविधा पुरवणारे हॉलिडे होम' - जितेश कामत

SCROLL FOR NEXT