Goa Road Accident Dainik Gomantak
गोवा

Goa Accident Case: बालरथ झाडावर आदळून पाच विद्यार्थी जखमी

Goa Accident Case: स्‍ट्रॉबेरी प्‍लांटेशन पाहायला गेलेल्‍या फोंडा येथील एका हायस्‍कूलच्‍या बालरथाला वेर्ले-नेत्रावळी येथे अपघात झाला.

दैनिक गोमन्तक

Goa Accident Case: स्‍ट्रॉबेरी प्‍लांटेशन पाहायला गेलेल्‍या फोंडा येथील एका हायस्‍कूलच्‍या बालरथाला वेर्ले-नेत्रावळी येथे अपघात झाला. चालकाचा ताबा सुटल्‍याने बालरथ झाडावर आदळला. त्‍यात 25 पैकी 5 विद्यार्थी व काही शिक्षक किरकोळ जखमी झाले.

त्‍यांच्‍यावर तातडीने सांगे आरोग्य केंद्रात उपचार करण्‍यात आले. ही दुर्घटना बुधवारी सकाळी 11.30 च्‍या सुमारास घडली, अशी माहिती सांगे पोलिसांनी दिली. यासंदर्भात अधिक माहिती अशी की, सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून नेत्रावळी येथील स्ट्रॉबेरी फार्मला विविध शाळांतील सुमारे 20 ते 25 विद्यार्थी भेट देत होते.

वेर्ले घाट उतरत असताना बालरथाला काही अडचण आल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि तो एका झाडावर आदळला. सुदैवाने कुणालाही मोठी दुखापत झाली नाही. अपघातापूर्वी चालकाने बसमधील समस्यांबाबत सांगून प्रवाशांना सतर्क केले होते, असे सांगण्‍यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT