Goan Street Food Sameera Reddy Video Dainik Gomantak
गोवा

Goan Street Food Sameera Reddy Video: समीरा रेड्डी म्हणते गोव्यात आल्यावर 'हे' 5 स्ट्रीट फूड खावेच लागतायेत!

गोवा भारत आणि विदेशातील पर्यटकांसाठी नेहमीचे हॉट डेस्टिनेशन राहिले आहे.

Pramod Yadav

Five Goan Street Food Suggested By Actress Sameera Reddy Video: गोवा भारत आणि विदेशातील पर्यटकांसाठी नेहमीचे हॉट डेस्टिनेशन राहिले आहे. गोव्यातील समुद्रकिनारे पाहणे आणि येथील सीफूड खाण्यासाठी खासकरुन पर्यटक येथे येत असतात. अनेक प्रसिद्ध कलाकार, खेळाडू, नामांकित लोक गोव्यात फिरणे आणि मौजमजा करण्यासाठी येत असतात.

अलिकडेच बॉलिवूड अभिनेत्री समीरा रेड्डीने गोव्याला भेट दिली होती, यावेळी तिने गोव्यातील पाच स्ट्रीट फूडची ओळख करुन देत, येथे आल्यावर त्यावर हामखास ताव मारला पाहिजे असे तिने म्हटले आहे.

1) रॉस ऑम्लेट - रॉस ऑम्लेट गोव्यातील सर्वात लोकप्रिय स्ट्रीट फूडपैकी एक आहे. रॉस ऑम्लेट अंड्याचे आमलेट चिकन किंवा मटण ग्रेव्हीसह कांदा आणि गोवन पावसोबत सर्व्ह केले जाते.

2) कटलेट ब्रेड - गोवन पावमध्ये भाजी, तळलेले मांस भरले जाते आणि सॉससह खाल्ले जाते.

3) भाजी पाव - भाजी पाव हे गोव्यातील एक लोकप्रिय स्ट्रीट फूड आहे. राज्यातील लोकांचा नाश्त्यासाठी आवडची पदार्थ आहे. ग्रेव्ही आणि बटाट्याची कोरडी भाजी पावासोबत खाल्ली जाते.

4) चिकन कॅफ्रेल - चिकन कॅफ्रेल गोव्यातील एक प्रसिद्ध डिश आहे. चिकन कॅफ्रेल मसाल्याची पेस्ट टाकून तयार केले जाते. खायला चविष्ट चिकन कॅफ्रेल निश्चित ट्राय करावे असा सल्ला समीराने दिला आहे.

5) कालवा ग्रेव्ही- समीराच्या लिस्टमधील अखेरचा पदार्थ आहे तो म्हणजे कालवा ग्रेव्ही. शिंपल्यांपासून बनवला जाणारा हा पदार्थ पावासोबत खाल्ला जातो.

बॉलिवूडमध्ये सध्या सक्रिय नसलेली समीरा सोशल मिडियावर अतिशय सक्रिय असते. तिचे विविध माहितीपर व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतात. समीराने सुचवलेले पाच स्ट्रीट फूड गोव्यात आल्यावर ट्राय करायला हरकत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

FC Goa vs Al Nassr: फातोर्डा मैदानाबाहेर कडक पोलिस बंदोबस्त, आज रंगणार एफसी गोवा-अल नस्सर यांच्यातील फुटबॉल सामना

Goa Politics: फातोर्ड्यात विरोधकांचा 'एकवट'! विरोधकांचे संघटितपणाचे प्रदर्शन; कॉंग्रेस, गोवा फॉरवर्ड, आरजीपीचे नेते एकत्र

Horoscope: सावधान! प्रेम जीवनात मोठे संकट! वृषभ-मकरसह 'या' 4 राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा

Goa Pollution: नरकासुराच्या नावावर पणजीत धुमाकूळ, वाहनचालकांची धूम; ध्वनी प्रदूषणामुळे पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

Porvorim Flyover Meeting: परवरी उड्डाणपूल प्रकल्पाच्या कामाचो घेतलो नियाळ - रोहन खंवटे

SCROLL FOR NEXT