Goa Fishing boat Dainik Gomantak
गोवा

Goa Fish: आजपासून ट्रॉलर्स खोल समुद्रात

गोव्यात (Goa) सात जेटीमधून सुमारे 900 हून अधिक ट्रॉलर्सनी मासेमारीसाठी (Fishing) नोंद केली आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: गोव्यात आजपासून मासेमारीला (Fishing) सुरवात होणार आहे. त्यासाठी बोटमालकांची (Boat) लगीनघाई चालली असली तरी अद्याप कामगार नसल्याने पहिल्याच दिवशी मासेमारीचा बोजवारा उडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. (Fishing starts in Goa from today)

दोन महिन्यांपासून मासेमारी बंद होती. सध्या राज्यभरातील सात जेटीमधून सुमारे 900 हून अधिक ट्रॉलर्सनी मासेमारीसाठी नोंद केली आहे, अशी माहिती खात्याचे उपसंचालक चंद्रकांत वेळीप यांनी दिली. खात्याच्या अधीक्षक मेधा केरकर म्हणाल्या, मासेमारीला रविवारपासून सुरवात झाली आहे. मात्र, कामगारांची कमतरता असल्याने कसा प्रतिसाद मिळतो, हे पहावे लागणार आहे. दुसरीकडे, किनाऱ्यापासून 75 कि.मी.अंतराच्यापुढे मच्छीमारांनी जाऊ नये, असे हवामान खात्याने म्हटले आहे.

राज्यातील अनेक मच्छीमार हे पावसाळ्‍यात शेतकाम करतात. यंदा अतिवृष्‍टीमुळे शेतीची कामे रखडली आहेत. भात लागवड संपल्याशिवाय हे कामगार मासेमारीकडे वळणार नाहीत. बाहेरील कामगारही गावी गेल्यामुळे कामगारांची वानवा आहे.

- सुजय देसाई, मालीम जेटी

दरम्यान गोवा सरकारने मच्छीमारी ट्रॉलर्ससाठी लागणाऱ्या डिझेलवरील व्हॅट काढून खास सूट देण्याची मागणी गोवा फिशिंग बोट मालक संघटनेचे अध्यक्ष जुझे फिलिप डिसोझा यांनी केली आहे. आजपासून मच्छीमारी बंदीकाळ उठत असून त्यासाठी खारी वाडा जेटीवर मच्छीमारीसाठी ट्रॉलर्स सज्ज ठेवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे. गेल्यावर्षी डिझेल 54 रुपये होते, या वर्षी ते 95 रुपये झाले आहे. आताचा नवीन दर लहान ट्रोलर मालकांना परवडणार नसून तो त्यांच्या आवाक्याबाहेर आहे. कारण कित्येक खेपेस मासे जाळ्यात अडकणारच असे नाही. मासे भेटले तर चार पैसे मिळणार. नाही तर नुकसानीला सामोरे जावे लागते. तेव्हा सरकारने याविषयी विचार करून डिझेलवर सूट देण्याची तरतूद करावी जेणेकरून ट्रॉलर मालकांना काही प्रमाणात दिलासा मिळेल. कारण फिंशिंग ट्रॉलर मालक डिझेलच्या वाढीव दरामुळे चिंताग्रस्त झाले आहेl. या वाढीव दरामुळे खोल समुद्रात मासेमारीसाठी जाणे धोक्याचे बनले असल्याचे फिलिप डिसोझा म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT