Fishing boat Dainik Gomantak
गोवा

मासेमारीसाठी एलईडी लाईट्स वापरणाऱ्यांवर आता कडक कारवाई होणार

मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाचे मच्छिमारी खाते तसेच किनारपट्टी पोलिसांना कठोर कारवाईचे निर्देश

विलास महाडिक

पणजी : राज्यात येत्या एक ऑगस्टपासून मासेमारी सुरू होणार आहे. मात्र मासेमारी ट्रॉलर्स वाल्यांकडून एलईडी लाईटचा वापर करून होणाऱ्या मासेवारीवर बंदी घालण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. याच याचिकेवर आज सुनावणी घेण्यात आली.

गोवा खंडपीठात मासेमारीसाठी वापरल्या जाणाऱ्या एलईडी लाईट्सना विरोध करण्यासाठी सादर करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर खंडपीठाने निवाडा दिला आहे. मच्छीमारी खाते तसेच किनारपट्टी पोलिसांना ट्रॉलर्स समुद्रात मासेमारीसाठी जाण्यापूर्वी त्यांची तपासणी करावी व त्यांच्याकडे एलईडी लाईटचा वापर करण्यासाठी जनरेटर वापरत नाही याची खात्री करावी, असे सक्त निर्देश कोर्टाने दिले आहेत. जर त्यांनी जनरेटरचा वापर केल्यास त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश गोवा खंडपीठाकडून देण्यात आले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vasco Land Project: वास्कोतील सरकारी जमीन लाटण्याचा घाट! गरज पडल्यास विरोधासाठी रस्त्यावर उतरणार- जुझे फिलिप डिसोझा

Goa High Court: हॉटेल एफएआर घोटाळा: 2 आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करा, अन्यथा मुख्य नगरनियोजकांना कोर्टात हजर राहावे लागेल

Goa Rough sea: बेतुल येथील फ्लोटिंग जेटी कोसळली; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, धोकादायक जेटी हटवण्याची मागणी

Meta AI Smart Glass: तुमची प्रत्येक हालचाल, प्रत्येक संवाद एआयच्या नजरेत? मेटा आणतंय 'सुपर-सेन्सिंग' चष्मा, पाहणाऱ्या-ऐकणाऱ्या गॅझेटमुळे गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह

Goa Hotel Death: फातोर्ड्यात खळबळ! नोएडातील व्यावसायिकाचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू, पुढील तपास सुरू

SCROLL FOR NEXT