Goa Fish 
गोवा

GOA: मासेमारी बंदी, ट्रॉलर्समधून माशांचे जाळे बाहेर, होड्या किनाऱ्यावर...

गोमंन्तक वृत्तसेवा

पणजी: राज्यात 1 जूनपासून दोन महिन्यासाठी मासेमारी बंदी काळ सुरू होणार असल्याने ट्रॉलर्समधून माशांची जाळी काढण्याचे तसेच काहीजण होड्या किनाऱ्यावर आणण्याचे काम सुरू होते. मच्छिमार खात्याने मासेमारी धक्केही या बंदी काळात सील करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या धक्क्यावरील डिझेल पंपना सील ठोकले जाणार असल्याची माहिती मच्छिमार खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिली. दरवर्षी 1 जून ते 31 जुलै हा गोव्यासाठी मासेमारी बंदी काळ असतो. त्यामुळे राज्यातील सर्व ट्रॉलर्स तसेच मोटारबोटींना मच्छिमारीला बंदी असते. या कोविड काळात राज्यातील गोव्यातील मच्छिमारीच्या व्यवसायावरही परिणाम झाला आहे. ट्रॉलर्सचे कर्मचारी या बंदी काळात आपापल्या मूळ गावी जातात मात्र कोविडमुळे अनेकजण अडकले आहेत. प्रत्येक मासेमारी धक्क्यावर मासळीची जाळी जमा करून ती वाहनाने नेण्याचे काम सुरू आहे.(Fishing banned in Goa for two months from tomorrow) 

सालाबादप्रमाणे 1 जूनपासून राज्यातील मासेमारी (Fishing) बंद होणार आहे. तब्बल 61 दिवस मासेमारी होणार नाही. त्यातच ‘कोविड’ (Covid-19) संकटाचा वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर परराज्यातून होणारी चिकनच्या (Chicken) कोंबड्या आणि माश्यांची आयात रखडली आहे. परीणामी, राज्यातील नागरिकांना पुढील दोन महिने ताज्या मासळीविना काढावे लागणार असून, सुकी मासळीचे दर वाढण्याची शक्यता आहे. 

मासे हा गोमंतकीयांचा ‘विक पॉईंट’ आहे. जग इकडे तिकडे झाले तरी गोमंतकीय नागरिकांच्या रांगा मच्छी मार्केटमध्ये दिसणे हे काही विशेष नाही. यंदा मान्सून वेळेत गोव्यात पोहचणार असल्याचे सुतोवाच हवामान वेधशाळेने केले आहे. परीणामी, 1 जूनपासून राज्यातील मासेमारी बंद करण्याचे आदेश मच्छीमार खात्याने दिले आहेत. त्यामुळे पुढील किमान 61 दिवस गोमंतकीयांना त्यांच्या आवडीचे मासे मिळणार नाहीत. त्यांना चिकन, मटन आणि सुक्या मासळींवर अवलंबून राहावे लागणार आहे.

एकीकडे मासेमारी बंद होणार आहे, त्यामुळे जणू मोठे संकटच ओढवणार आहे. तर दुसरीकडे बेळगाव आणि कोकणात कोरोना प्रादुर्भावामुळे पोल्ट्री व्यवसाय धोक्यात आला आहे. चिकनच्या कोंबड्यांची आयात गेल्या कांही दिवसांपासून थंडावली असल्याचे मत पशूसंवर्धन खात्याचे अतिरिक्त संचालक प्रकाश कोरगावकर व्यक्त करतात. एकंदर गोमंतकीयांना पुढील दोन महिने शाकाहारावर गुजराण करावी लागणार हे निश्चित आहे.  

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT