Fishing Dainik Gomantak
गोवा

Rainy Season In Goa: मच्छीमार, ट्रॉलर्समालकांची जेटींवर आवराआवर

एक जूनपासून मासेमारी बंद : पुढील दोन महिने मानस, रापणीच्या मासळीला वाढणार मागणी

गोमन्तक डिजिटल टीम

Rainy Season In Goa Fishing Stops From June 1st: मासळीशिवाय गोमंतकीयांच्या घशात घास उतरत नाही. रोजच्या ताटात थोडी तरी मासळी हवीच.

अशी ही मत्स्यखवय्यांची मासळी एक जूनपासून मिळणे दुरापास्त होणार आहे. कारण दरवर्षीप्रमाणे यंदाही एक जून ते एक ऑगस्टपर्यंत मासेमारी बंदी लागू करण्यात येणार आहे.

मच्छीमार, ट्रॉलरमालकांनी जेटीवर आवराआवर सुरू केली असून जाळी आणि मासेमारीची उपकरणे बंद करण्यास सुरुवात केली आहे.

मासे पकडण्यासाठी खोल समुद्रात जाणारे मोठे ट्रॉलर्स, बोटींवर सरकार दरवर्षी बंदी घालते. 1 जून ते 1 ऑगस्ट या दोन महिन्यांच्या कालावधीत समुद्र खवळलेला असतो. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव आणि माशांचा प्रजनन काळ लक्षात घेता ही बंदी घालण्यात येते.

मालीम जेटीवरील काही मच्छीमारांना विचारले असता, त्यांनी सांगितले की, यावर्षी मासळीचा व्यवसाय चांगला झाला असून, मागील वर्षीच्या तुलनेत मासेमारी चांगली झाली.

या दोन महिन्यांच्या बंदी काळात काय केले जाते, असे विचारले असता मच्छीमारांनी सांगितले की, ट्रॉलर्समालक ट्रॉलर्स आणि बोटींच्या दुरुस्ती व देखभालीचे काम करतात.

शिवाय ट्रॉलरवर काम करणारे मच्छीमार, स्थलांतरित कामगार त्यांच्या मूळ ठिकाणी परततात आणि दोन महिने विश्रांती घेतात. तसेच संबंधित अधिकारी सुरक्षा आणि स्वच्छतेसाठी गोव्यातील जेटींची तपासणी करतात.

बंदीचा कालावधी 61दिवस

या 61 दिवसांच्या बंदी कालावधीत यांत्रिक साधने बसवलेल्या जहाजांद्वारे मासेमारी आणि ट्रॉल-नेट आणि पर्स-सीन नेटद्वारे मासेमारी करण्यास मनाई असेल, असे मत्स्य व्यवसाय विभागाने म्हटले आहे. मत्स्यव्यवसाय संचालक डॉ. शमिला मोन्तेरो यांनी हा आदेश जारी केला आहे.

पावसाळा तोंडावर आल्यामुळे समुद्रातील मासेमारी राज्य सरकारच्या नियमानुसार बंद ठेवावी लागणार आहे. हे वर्षानुवर्षे सुरू आहे. त्यानुसार आम्ही या नियमांचे पालन करणार आहोत. कारण या दिवसांत समुद्रही खवळलेला असतो.

- पेले फर्नांडिस, मच्छीमार, बाणावली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Wari: विठ्ठलनामाचा गजर, पंढरीकडे वारकऱ्यांची वाटचाल; पिळगाव येथून प्रथमच निघाली पायीवारी, महिलांसह एकूण 160 जणांचा सहभाग

Elton D Costa: "विठ्ठल-रखुमाईच्या चरणी समाजाच्या सुख-समृद्धीसाठी साकडं!" आमदार एल्टन डिकॉस्टा यांनी भक्तीभावाने घेतले दर्शन

Goa Agriculture: "सुपीक शेतजमिनींवर एकही प्रकल्प नकोच!" दुधाला तातडीने हमीभाव वाढ द्या ,भारतीय किसान संघाचा सरकारला थेट इशारा

Consumer court: अभिनेत्री मौसमी चटर्जी यांना न्यायालयाचा मोठा झटका! कार्यक्रमाला दांडी मारणे पडले महाग; ३ लाखांच्या दंडासह नुकसान भरपाईचा आदेश

Goa health Camp: 14 महिलांमध्ये 'बेनाइन' स्तनगाठी; 163 नागरिकांची तपासणी, धारबांदोडा येथे कर्करोग निदान शिबिर

SCROLL FOR NEXT