Goa fish market Dainik Gomantak
गोवा

Goa Fishing: 'कर्जाचे हप्ते भरावे लागतात, पगार द्यावा लागतो'! मच्‍छीमार समस्यांच्या गर्तेत; मासेमारी बंदी 90 दिवसांची करण्याची मागणी

Goa fishing ban: मच्‍छीमार वासुदेव केरकर यांनी सांगितले की, गेल्या पाच ते सहा वर्षांपासून मासेमारी हंगाम व्यवस्थित होताना दिसत नाही. मासे जास्त प्रमाणात जाळ्यात सापडत नाहीत.

Sameer Panditrao

सासष्टी: मासेमारी बंदी ६० दिवसांऐवजी ९० दिवसांसाठी केली व पारंपरिक मच्छीमारांना मासेमारीसाठी त्यातील १५ ते ३० दिवस दिले तर माशांचे प्रजनन चांगल्या प्रकारे व वाढत्या प्रमाणात होणे शक्य होईल, असे मच्‍छीमार राजन केरकर यांनी सांगितले.

यासंदर्भात बोलताना राजन केरकर म्‍हणाले की, मासेमारी हंगामास १ ऑगस्टपासून सुरवात झाली, पण मच्छीमारांना अजूनपर्यंत मोठ्या प्रमाणात मासे सापडलेले नाहीत. त्यामुळे बोटमालक व पारंपरिक मच्छमार चिंतेत सापडले आहेत. अरबी समुद्रामध्ये वादळी हवामान असल्याने काही दिवसांपासून मच्छीमारांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

वादळी हवामानामुळे आपली बोट कारवार समुद्रात अडकून पडली आहे. बेतुल किनाऱ्यावर आणण्यासाठी आणखी किती दिवस लागतील सांगता येत नाही. दुसरे कारण म्हणजे अजूनपर्यंत माशांचे प्रजनन योग्य प्रकारे व वाढत्या प्रमाणात झालेले नाही. आम्हाला केवळ १२ ते १५ दिवसच मासेमारी करता आली. तसेच काही ट्रॉलरमालक पारंपरिक मच्छीमारांना संधी न देता स्वतःच्या बोटी समुद्रात नेतात.

समुद्रकिनाऱ्यावरून ५ किलोमीटर आत येऊन मासेमारी करतात. त्यामुळे पारंपरिक मच्छीमारांवर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही राजन केरकर यांनी सांगितले.

दरम्‍यान, अन्‍य एक मच्‍छीमार वासुदेव केरकर यांनी सांगितले की, गेल्या पाच ते सहा वर्षांपासून मासेमारी हंगाम व्यवस्थित होताना दिसत नाही. मासे जास्त प्रमाणात जाळ्यात सापडत नाहीत. शिवाय ट्रॉलरवाले नियमांचा भंग करताना दिसत आहेत. आम्हाला बँक कर्जाचे हप्ते भरावे लागतात, मजुरांना पगार द्यावा लागतो, राज्य सरकारकडून आता अनुदानसुद्धा बंद झालेले आहे. मच्छीमारांना मदत करणे गरजेचे आहे.

मच्छीमारांपुढील मुख्‍य अडचणी

वादळी हवामानामुळे समुद्रात बोट अडकण्याच्या घटना

दरवर्षी माशांचे प्रजनन कमी होण्‍याचे प्रमाण

ट्रॉलरवाल्यांकडून नियमांचा सर्रास भंग

बँक कर्जाचे हप्ते व मजुरांचे पगार भरताना समस्‍या

सरकारकडून अनुदान बंद झाल्याने आर्थिक संकट

मच्छीमारांच्‍या मुख्य मागण्‍या

मासेमारी बंदी ६० दिवसांऐवजी ९० दिवसांची करावी

त्यातील १५ ते ३० दिवस पारंपरिक मच्छिमारांसाठी राखीव ठेवावेत

किनाऱ्यापासून ५ किलोमीटर आत ट्रॉलर्सना मासेमारीस बंदी करावी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT