Vasco Fish vendors Dainik Gomantak
गोवा

Vasco News : कारवाई करा, अन्यथा पालिकेसमोर मासळी विक्री करु; नगराध्यक्षांना इशारा

मासळी मार्केटमधील मासळी विक्रेत्या महिलांचा नगराध्यक्षांना इशारा

दैनिक गोमन्तक डिजिटल

खारीवाडा वास्को येथे घाऊक मासळी विक्रेत्यांवर तसेच रस्त्याच्या कडेला मोक्याच्या ठिकाणी बसून मासळी विक्री करणा-या लमाणी मासळी विक्रेत्यांचा व्यवसाय तेजीत चालला असून याचा मासळी मार्केट मधील मासळी विक्रेत्यांच्या व्यावसायावर परिणाम होत असल्याने आज मासळी मार्केटमधील मासळी विक्रेत्या महिलांनी पुन्हा पालिकेत येऊन ठिय्या मांडला. नगराध्यक्ष लिओ रॉड्रीगीस यांना घेराव घालून त्यांनी दिलेला शब्द पाळत नसल्याने नाराजी व्यक्त केली.

महिलांनी खारीवाडा येथे घाऊक मासळी विक्रेत्यांनी चालवलेल्या व्यावसायाबद्दल सांगितले असता नगराध्यक्षांनी आपण पोलिसांमार्फत या विषयी करवाई करण्याचे आश्वासन मासळी मार्केट मधील मासळी विक्रेत्यांना दिले. संबंधितांवर कारवाई न केल्यास आम्ही आमचा व्यवसाय पालिके समोर थाटून मासळी विक्री करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

मासळी विक्रेत्यांच्या मागणीनुसार आमदार साळकर व पालिका मुख्याधिकारी, नगराध्यक्षांनी घाऊक मासळी विक्रेते व लमाणी मासळी विक्रेत्यांवर पोलिस कारवाई करून व्यावसाय बंद पाडला. त्यानुसार मासळी मार्केट मधील मासळी विक्रेत्या महिलांनी मासळी मार्केट प्रकल्पाच्या कामाला सुरू करण्यास राजी झाल्या. त्याप्रमाणे त्यांना येथील देव दामोदर ट्रस्टच्या जागेवर उभारण्यात तात्पुरत्या शेड मध्ये स्थलांतरीत करण्यात आले आहे.

दरम्यान खारीवाडा येथील घाऊक मासळी विक्रेत्यांनी आपला व्यावसाय पुन्हा थाटल्याने याठीकाणी मासळी खव्वयांची गर्दी दिवसें दिवस वाढत असल्याने तसेच लमाणी मासळी विक्रेत्यांचा पुन्हा उच्छेद निर्माण झाल्याने मासळी मार्केट मधील मासळी विक्रेत्यांच्या व्यवसायावर परीणाम होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ganesh Idol: विसर्जनानंतर किनाऱ्यांवर 'गणेशमूर्तीं'ची होणारी विटंबना, यंदा तरी कठोर कारवाई होणार का?

Zodiac Personality Traits: खिशाला कात्री लावणे यांच्या रक्तातच नाही! 'या' 3 ग्रहांचे राजे पैशांच्या बाबतीत का असतात एवढे कडक?

Social Media Post Controversy: अभिषेक शर्माची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्ट आणि फोटोंबाबत कोर्ट देणार अंतरिम आदेश

Sattari Heavy Rain: सत्तरीत वीजवाहिन्यांची मोठी हानी; वादळी वाऱ्यामुळे झाडांची पडझड सुरूच

Vasco Land Project: वास्कोतील सरकारी जमीन लाटण्याचा घाट! गरज पडल्यास विरोधासाठी रस्त्यावर उतरणार- जुझे फिलिप डिसोझा

SCROLL FOR NEXT