Panaji Fish Market Dainik Gomantak
गोवा

Panjim Fish Market: मासळी विक्रेत्यांनाही तेथून हटवणार; धोकादायक इमारतीबाबत मनपाची खंडपीठाला माहिती

Panjim Municipal Council: इमारत धोकादायक असल्याने मासळी विक्रेत्यांना का हटवण्यात आले नाही, असा प्रश्‍न मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने पणजी महापालिकेला केला होता

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: पणजी मासळी मार्केटमधील इमारत धोकादायक असल्याच्या नावाखाली तेथील मांस विक्रेत्यांची दुकाने सील करून हटवले आहे. मात्र तळमजल्यावरील इतर काही दुकाने व मासळी विक्रेत्यांना हटवले नव्हते.

ही इमारत धोकादायक असल्याने मासळी विक्रेत्यांना का हटवण्यात आले नाही, असा प्रश्‍न मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने पणजी महापालिकेला केला होता. या मासळी विक्रेत्यांनाही तेथून हटवण्यात येईल व त्यासंदर्भातचा आदेश महापालिका आयुक्त काढतील, अशी माहिती आज खंडपीठाला देण्यात आली. त्यामुळे मांस विक्रेत्यांच्या याचिकेवरील सुनावणी १८ सप्टेंबरपर्यंत तहकूब करण्यात आली.

पणजी महापालिकेने ही मासळी मार्केटमधील इमारत धोकादायक ठरवून तेथील सात मांस विक्रेत्यांना नोटीस बजावली होती व त्यांच्या दुकानांना महापालिकेने सील ठोकले आहे. त्यामुळे हे सर्वजण उच्च न्यायालयात गेले आहेत.

महापालिकेने मांस विक्रेत्यांविरुद्ध कठोर निर्णय घेऊन त्यांना पर्यायी व्यवस्था केलेली नाही. ही इमारत पाडून त्याच्या जागी नव्याने इमारत बांधली जाईल त्यात या मांस विक्रेत्यांना दुकाने देणार आहे की नाही, याची माहिती नोटिशीत नव्हती.

महापालिकेने इमारत पाडण्याचा निर्णय घेतला तरी त्याजागी नवी इमारत बांधली जाईल की नाही यासंदर्भात स्पष्टता नाही. मांस विक्री दुकानांना सील ठोकल्याने हा व्यवसायच ठप्प झाला आहे. या इमारतीत काही मटण व चिकनची दुकाने आहेत, त्यांना नोटीस बजावून सील ठोकलेले नाही. मांस विक्रेत्यांना पर्यायी जागा देण्यासंदर्भात मनपाचा उद्देश दिसत नाही, अशी बाजू याचिकादाराच्या वकिलांनी मांडली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT