Nilkanth Halarnkar Dainik Gomantak
गोवा

Goa Fishing: ..म्हणून सरकारने अंजुणे, आमठाणे जलाशयांत सोडली मत्स्यबिजे

Fishing: नीळकंठ हळर्णकर : गोड्या पाण्यातील मासेमारीला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न

दैनिक गोमन्तक

Goa Fishing: मत्स्योद्योग मंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी आज केरी-सत्तरी येथे अंजुणे धरणात आणि आमठाणे जलाशयात मत्स्यबिजे सोडली. मत्स्योद्योग संचालिका शमिला मोन्तेरो याही यावेळी उपस्थित होत्या.

हळर्णकर यांनी मत्स्य उत्पादनात वाढ करण्यासाठी आणि राज्यातील मासळीची मागणी पूर्ण करण्यासाठी गोड्या पाण्यातील मासेमारीला प्रोत्साहन देण्याचा सरकारचा विचार असल्याचे सांगितले. तांत्रिक पद्धतीने पिंजरा संवर्धनाद्वारे गोड्या पाण्यातील मासेमारी करण्यासाठी लोकांनी पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

हळर्णकर यांनी केरी फार्ममध्ये विविध प्रकारच्या माशांच्या प्रजननासाठी उपलब्ध असलेल्या सुविधांचीही ओळख करून घेतली. तसेच शेतात पिकविलेल्या शोभिवंत माशांच्या उत्पादकतेची माहिती करून घेतली आणि शोभिवंत मासळीचे आणखी प्रकार ठेवण्याचे व विक्री करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

5 लाख मासे साठविले जातील

मत्स्योद्योग खाते दरवर्षी चापोली, साळावली, आमठाणे, अंजुणे आणि पंचवाडी जलाशय येथे कातला, रोहू आणि कॉमन कार्पच्या माशांचा साठा करते. या वर्षी खात्याने राज्यातील सर्व जलाशयांमध्ये फिंगरलिंग्सचा साठा करण्याचे नियोजन केले आहे.

इंडियन मेजर कार्प म्हणजेच रोहू, कातला आणि मॅरिगल तसेच इतर कार्प म्हणजे कॉमन कार्प, ग्रास कार्प आणि सिल्व्हर कार्प प्रत्येक जलाशयात एकूण 5 लाख मासे फिंगरलिंगच्या प्रमाणात साठविले जातील.

मत्स्योद्योग खाते दरवर्षी चापोली, साळावली, आमठाणे, अंजुणे आणि पंचवाडी जलाशय येथे कातला, रोहू आणि कॉमन कार्पच्या माशांचा साठा करते. या वर्षी खात्याने राज्यातील सर्व जलाशयांमध्ये फिंगरलिंग्सचा साठा करण्याचे नियोजन केले आहे. इंडियन मेजर कार्प म्हणजेच रोहू, कातला आणि मॅरिगल तसेच इतर कार्प म्हणजे कॉमन कार्प, ग्रास कार्प आणि सिल्व्हर कार्प प्रत्येक जलाशयात एकूण 5 लाख मासे फिंगरलिंगच्या प्रमाणात साठविले जातील.

मत्स्योद्योग संचालकांच्या पुढाकाराने सध्याच्या जलाशयात रोहू, कातला, कॉमन कार्प या माशांच्या प्रजातींचा समावेश असलेल्या सुमारे पाच लाख माशांचा साठा करण्यात आला आहे. फिंगरलिंग्सचा साठा हा जलाशयातील मत्स्यपालन विकासाचा मुख्य आधार आहे.

ज्यामुळे शाश्वत आधारावर मत्स्य उत्पादन सुलभ होईल. ऑटो स्टॉकिंग शक्य नाही आणि जलसाठ्याची उत्पादक क्षमता वापरण्यासाठी नियमित स्टॉकिंग प्रोग्राम आवश्यक आहे.- नीळकंठ हळर्णकर, मत्स्योद्योग मंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT