Goa Fish Market Problems Dainik Gomantak
गोवा

Goa Fish Market: वास्को मासळी मार्केटमधील समस्या सोडवा, माजी मंत्री जुझे फिलिप यांचं आवाहन; 'पाण्याचा निचरा करा अन्यथा...'

Fish Market Drainage Issue: मार्केट बांधू दिले नाही याची जुझे फिलिप डिसोझा यांनी आठवण करून दिली.

दैनिक गोमन्तक डिजिटल

वास्को: येथील मासळी मार्केटमध्ये सहा महिन्यांमध्ये विविध समस्या निर्माण झाल्याने माजी मंत्री व गोवा फिशिंग बोट ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष जुझे फिलिप डिसोझा यांनी नाराजी व्यक्त केली आहे. संबंधित समस्या दूर झाल्या नाही, तर आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.

दरम्यान, ओल्ड क्रॉस सोसायटीचे अध्यक्ष व मच्छीमार बांधव क्रिस्तोडिओ डिसोझा यांनी मंगळवारी (ता. ४) आम्ही मासळी मार्केटच्या पाहणीप्रसंगी सर्व मासे विक्रेत्यांसह उपस्थित राहणार असल्याचे स्पष्ट केले. मावळते नगराध्यक्ष गिरीश बोरकर यांनी केलेल्या आवाहनानुसार क्रिस्तोडिओ डिसोझा यांनी आम्ही निमंत्रण स्वीकारत असल्याचे सांगितले.

मासळी मार्केटातील पाण्याचा निचरा योग्यरित्या होत नसल्याने तसेच तेथे दुर्गंधी पसरत असल्याने मार्केटातील मासे विक्रेत्या गेल्या वीस दिवसांपासून मार्केट समोरच्या रस्त्यावर दुतर्फा मासे विक्री करीत आहेत. या मार्केटातील पाण्याचा निचरा योग्यरित्या व्हावा यासाठी तेथे काम सुरू आहे.मासळी मार्केटसंबंधी आमदार कृष्णा साळकर व विरोधक यांच्यामध्ये दावे प्रतिदावे सुरू झाले आहेत. पाण्याचा निचरा होण्यासाठी जर्मन टेक्नोलॉजीचा वापर करण्यात येणार असल्याचे साळकर यांनी सांगितले. ते काम सध्या सुरू आहे.

याप्रकरणी जुझे फिलिप डिसोझा यांनी पाहणी करून तेथील माहिती घेतली. तेथे पाण्याचा निचरा व्हावा यासाठी कोणती उपाययोजना करण्यात आली आहे यासंबंधी तेथे उपस्थित असलेल्या अधिकाऱ्याने माहिती दिली. क्रिस्टोडिओ डिसौझा यांनीही या मार्केट इमारतीसंबंधी काही प्रश्न उपस्थित केले. तिसरा मजला कोणासाठी बांधला असा त्यांनी प्रश्न विचारला आहे.

मावळते नगराध्यक्ष बोरकर यांनी आमदार साळकर यांच्यासह चार दिवसांपूर्वी पाहणी केल्यावर विरोधकांनी तसेच इतरांनी मंगळवारी होणाऱ्या पाहणीप्रसंगी उपस्थित रहावे, असे आवाहन केले होते. त्यानुसार आम्ही उपस्थित राहून आमच्या समस्या मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.

‘मासेमारी उद्योग संकटात’

मी आमदार असताना मार्केट बांधण्यासाठी निधी आणला होता. तथापी, तेव्हा मला मार्केट बांधू दिले नाही याची जुझे फिलिप डिसोझा यांनी आठवण करून दिली. वास्कोतील फिशिंग जेटीच्या देखभालीकडे दुर्लक्ष केले जाते, डिझेलचे भाव वाढले आहे. मच्छीमारांना योग्य सुविधा मिळत नाही. यामुळे मासेमारी उद्योग संकटात सापडण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे.

‘मार्केट बांधताना खबरदारी का घेतली नाही?’

मार्केट बांधून झाल्यावर, आता तेथील पाण्याचा निचरा योग्यरित्या व्हावा यासाठी उपाययोजना करण्यात येत असल्याबद्दल जुझे फिलिप डिसोझा यांनी आश्र्चर्य व्यक्त केले आहे. मार्केट बांधताना खबरदारी का घेतली नाही, नावाच्या प्रसिध्दीसाठी प्रकल्प कसाही बांधू नका. योग्य आराखडा नव्हता, तर मार्केट बांधलेच कशाला? असे सवाल त्यांनी उपस्थित केले. या मार्केटात दुर्गंधी पसरत आहे. योग्य खबरदारी घेतली असती, मासे विक्रेत्यांना विश्र्वासात घेतले असते, तर त्या मासे विक्रेत्या आज मासे विक्रीसाठी रस्त्यावर बसल्या नसत्या, असेही ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sant Dnyaneshwari Philosophy: 'ज्ञानेश्वरी' आजही जीवनाचा शाश्वत दीपस्तंभ! कृत्रिम बुद्धिमत्ता, तणाव आणि वेगवान जीवनशैलीच्या युगात विवेक, करुणा अन् संतुलनाचा मार्ग

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

9/11 हल्ल्याच्या आधी 'भारत' होता लादेनच्या टार्गेटवर! CIAच्या सीक्रेट रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा; अल-कायदाचा जागतिक विनाशाचा मास्टरप्लॅन

शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली अन् प्रतापबिंबाची कोकणावर स्वारी! १० हजारांच्या फौजेसह जिंकला प्रदेश; उजाड भूमी पुन्हा वसवण्याचा घेतला ध्यास

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

SCROLL FOR NEXT