Navelim Stadium  Goa JD
गोवा

Mandrem Indoor Stadium: गोव्यात पहिल्यांदाच साकारण्यात येणार इनडोअर स्टेडियममध्ये 'स्विमिंग पूल', 70 कोटींचा प्लॅन; अरोलकरांची माहिती

Mandrem Indoor Stadium: मांद्रे पंचायत क्षेत्रात ७० कोटींपेक्षा जास्त खर्च करून बहुउद्देशीय क्रीडा मैदान उभारण्याबरोबरच गोव्यात प्रथमच इनडोअर स्टेडियममध्ये स्विमिंग पूल उभारण्याची योजना आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

मांद्रे मतदार संघातील खेळाडूंना आणि वेगवेगळ्या कला, क्रीडा प्रकारांना वाव देण्यासाठी मांद्रे पंचायत क्षेत्रात ७० कोटींपेक्षा जास्त खर्च करून बहुउद्देशीय क्रीडा मैदान उभारण्याबरोबरच गोव्यात प्रथमच इनडोअर स्टेडियममध्ये स्विमिंग पूल उभारण्याची योजना आहे,अशी माहिती मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांनी दिली. क्रीडा अधिकारी आणि इतर स्थानिक पंच सदस्यांच्या उपस्थितीत मांद्रे मैदानाची पाहणी केली. त्यावेळी अधिकाऱ्यांना सूचना करत असताना आरोलकर यांनी माहिती दिली.

आमदार आरोलकर म्हणाले, या प्रकल्पासाठीचा खर्च केंद्र की राज्य सरकारमधून उपलब्ध होईल हे काही दिवसानंतर कळणार आहे. तोपर्यंत प्रकल्पाचा पूर्ण आराखडा तयार करण्यात येणार आहे. इनडोअर स्विमिंग पूल उभारण्याचा प्रथमच प्रयोग राज्यात होणार आहे. शिवाय हा स्विमिंग पूल उभारताना उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात बदलते वातावरण करण्यासाठी तशी तरतूद केली जाईल.

मांद्रे पंचायत क्षेत्रातील जे ३० वर्षांपूर्वीचे क्रीडा मैदान उपलब्ध होते. त्या मैदानाचा नवीन आराखडा तयार करून त्या ठिकाणी सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आमदार जीत आरोलकर यांनी सरकार दरबारी प्रयत्न केले आहेत. शिवाय क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनीही १००% सहकार्य दिल्यामुळे हा प्रकल्प आता मार्गी लागणार आहे. २५ रोजी आमदार जीत आरोलकर स्थानिक पंचायत मंडळ अधिकारी यांनी या आराखड्याविषयी चर्चा केली. आमदार आरोलकर यांनी अधिकाऱ्यांना क्रीडापटूंना सर्व प्रकारच्या सोयी सुविधा कशा उपलब्ध होतील त्याकडे लक्ष देण्याची सूचना केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

SCROLL FOR NEXT