Harmal  Dainik Gomantak
गोवा

Harmal News : हरमल येथील भरत वस्त यांना नाट्य दिग्दर्शनाचे प्रथम बक्षीस

Harmal News : या नाटकात आकर्षक दिंडी सादर केली व त्या दिंडीत २०-२५ लहान थोर भाविकांनी समरसून भाग घेतला होता. या नाटकात दिनेश कोचरेकर (सावता) यांनी भूमिका सादर करून अभिनयाचे प्रथम बक्षीस प्राप्त केले.

गोमन्तक डिजिटल टीम

Harmal News :

हरमल, येथील दुर्वांकुर कला केंद्राने आयोजित केलेल्या ७ व्या हरमल ग्राम मर्यादित नाट्य स्पर्धेत उत्कृष्ट दिग्दर्शनाचे प्रथम बक्षीस खालचावाडा - हरमल येथील नाट्य कलाकार भरत वस्त यांना देण्यात आले. या यशाबद्दल त्यांचे सर्व थरातून अभिनंदन केले जात आहे.

या स्पर्धेत श्री राष्ट्रोळी कलावर्धीनी वस्तवाडा यांच्या सं. ‘सावतामाळी’ नाटकास प्रथम बक्षीस प्राप्त झाले. त्या नाटकाचे दिग्दर्शन भरत वस्त यांनी केले व त्यांच्या दिग्दर्शनाखाली व उत्कृष्ठ नेपथ्य संकल्पना साकारलेली होती. या नाटकात आकर्षक दिंडी सादर केली व त्या दिंडीत २०-२५ लहान थोर भाविकांनी समरसून भाग घेतला होता. या नाटकात दिनेश कोचरेकर (सावता) यांनी भूमिका सादर करून अभिनयाचे प्रथम बक्षीस प्राप्त केले. सं. ‘सावतामाळी’ नाटकास सांघिक व वैयक्तिक मिळून तीन बक्षिसे मिळाली.

ही स्पर्धा हरमल जिल्हा पंचायत सदस्य रंगनाथ कलशांवकर, मांद्रेचे माजी सरपंच व विद्यमान पंच ॲड. अमित सावंत व हरसन पेट्रोलियमचे मालक रजत हरमलकर यांनी पुरस्कृत केली होती. बक्षीस वितरण समारंभास हरमल सरपंच रजनी इब्रामपुरकर, पंच ॲड. अमित सावंत, परीक्षक सोमनाथ पार्सेकर व हरीश शेटगावकर उपस्थित होते. सूत्रसंचालन सचिव अर्जुन गडेकर यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

चार्जिंगचे टेन्शन कायमचे संपले! Redmi ने भारतात लॉन्च केले 10,000mAh बॅटरीचे 2 तगडे फोन; जाणून घ्या बजेटमधील किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

Robotic Surgery: कमी वेदना, जलद रिकव्हरी! रोबोटिक सर्जरी म्हणजे काय? नॉर्मल ऑपरेशनपेक्षा किती वेगळी? जाणून घ्या वैद्यकीय तज्ज्ञांकडून

Oracle Layoffs 2026: सकाळी 6 वाजता मेल आला अन् नोकरी गेली! ओरॅकलने पुन्हा दिला कर्मचाऱ्यांना नारळ; टेक कंपन्यांमध्ये चाललंय तरी काय?

Viral Video: ना धड इंग्रजी बोलता येईना, ना वाचता येईना! पाकिस्तानी आमदाराचा व्हिडिओ व्हायरल; सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी घेतली फिरकी

SCROLL FOR NEXT