Cancer Screening Mission Goa Canva
गोवा

'Bicholim Cancer Screening'मध्ये आढळला स्वादुपिंडाचा रुग्ण! कर्करोगाचे तब्बल 129 संशयित; डिचोलीत 253 जणांची तपासणी

Cancer Screening Mission Goa: डिचोली येथे केलेल्या कर्करोग निदान अभियानात अल्ट्रासाऊंड स्कॅनिंगद्वारे पहिला स्वादुपिंडाचा कर्करोग रुग्ण आढळला. या अभियानात कर्करोगाचे तब्बल १२९ रुग्ण आढळले.

गोमन्तक डिजिटल टीम

Cancer Screening Mission Bicholim Goa

पणजी: शनिवारी सामुदायिक आरोग्य केंद्र डिचोली येथे केलेल्या कर्करोग निदान अभियानात अल्ट्रासाऊंड स्कॅनिंगद्वारे पहिला स्वादुपिंडाचा कर्करोग रुग्ण आढळला. या अभियानात कर्करोगाचे तब्बल १२९ रुग्ण आढळले. त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू करण्यात येणार आहेत. आजच्या अभियानात एकूण २५३ रुग्णांची तपासणी केली. त्यात ७६ पुरुष आणि १७७ महिलांचा समावेश होता. शिवाय डेन्टल मोबाईल व्हॅनद्वारे एकूण १२ रुग्णांना उपचार देण्यात आले.

हे अभियान सार्वजनिक आरोग्य आणि आरोग्याच्या दृष्टीकोनातून मोलाचे योगदान देत आहे, या अभियानात गर्भाशय गळ्याच्या कर्करोग निदानासाठी ६२ पॅप स्मीअर्स घेण्यात आले. तसेच प्रोस्टेट कर्करोग निदानासाठी २७ पीएसए चाचण्या केल्या.

त्यात ६ पूर्व-कर्करोगीय मौखिक घाव सापडले. तसेच स्पेकल्ड लेकोप्लेकियाचा एक रुग्ण, लेकोप्लेकियाचे २ रुग्ण, तंबाखू पिशवी केराटोसिसचे २ रुग्ण आणि ओरल सबम्युकोसल फायब्रोसिस प्रथम स्टेजचा एक रुग्ण आढळला. ६ सौम्य मौखिक घाव देखील ओळखले गेले. यात आघातजन्य जखमा, स्टोमॅटायटीस, कॅंडिडिआसिस आणि ओरल लिकेन प्लॅनस यांचा समावेश असल्याची माहिती डॉ. काकोडकर यांनी दिली.

‘कॅन्सर स्क्रिनिंग’ अभियानांतर्गत आरोग्य खात्यातर्फे डिचोलीत आयोजित शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात जवळपास २५३ रुग्णांची तपासणी करण्यात आली. काही रुग्णांचे मोबाईल वाहन युनिटमधून स्क्रिनिंग करण्यात आले. शिबिरात सहा रुग्णांमध्ये कर्करोगाची प्राथमिक लक्षणे आढळून आल्याची माहिती मिळाली आहे.

डिचोलीच्या सामाजिक आरोग्य केंद्रात आयोजित या कर्करोग निदान शिबिराचे उद्‍घाटन नगराध्यक्ष कुंदन फळारी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ‘गोमेकॉ’चे मेडिसिन विभाग प्रमुख डॉ. जगदीश काकोडकर, आरोग्य खात्याचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. उत्तम देसाई, दंत महाविद्यालयाचे डॉ. नायजेल फिगेदेरो, डॉ. नवीन शिरोडकर, तन्वी सावंत आणि दिव्या नाईकउपस्थित होते

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Fraud: शेअर मार्केटमधून चांगला परतावा देण्याच्या बहाण्याने कोट्यवधी लाटले, आरोपी लंडनला फरार; पोलिसांची शोध मोहीम सुरु!

Kulem Gram Sabha: कुळे ग्रामसभा तापली! ऑडिट रिपोर्टवरुन ग्रामस्थांनी सरपंचांना घेरले; मार्केट कॉमप्लेक्सच्या मुद्यावरुन वादंग

Goa Live Updates: गोव्याचा सन्मान! बेस्ट कोस्टल स्पिरीट शोकेस पुरस्काराने गौरव

Anjuna News: गोव्यात संगीत महोत्सवाचा वाद चिघळला, भर सभेत तरुणाला मारहाण; Video Viral

Goa Politics: ''महाराष्ट्रात महायुतीला विजय मिळाला म्हणून गोव्यातील विरोधक...''; सरदेसाईंचा घणाघात

SCROLL FOR NEXT