Firefighters Saved Man  Dainik Gomantak
गोवा

Goa Firefighters : 80 फूट खोल विहिरीत पडलेल्या माणसाला जीवदान; वागातोरमधील घटना

जवानांनी धाडस दाखवत त्या इसमाला सुखरूप बाहेर काढले.

दैनिक गोमन्तक

अग्निशमन दलाच्या जवानांच्या कर्तृत्वाचे किस्से आपण याआधी ही ऐकले आणि पाहिले आहेत. अशीच एक गोष्ट वागातोरमध्ये घडली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांना खोल विहिरीत पडलेल्या माणसाला जीवदान दिले आहे. (Firefighters Saved Man )

माहितीनुसार, वागातोर शापोरा येथे एका आंब्याच्या झाडाजवळ असलेल्या विहिरीमध्ये पश्चिम बंगालचा एक रहिवासी पडला होता. मात्र याची माहिती अग्निशमन दलाच्या जवानांना मिळताच जवान गिरीश गवस आणि अर्जुन धावस्कर यांनी त्या 26 वर्षीय माणसाला मध्यरात्री सुखरूपपणे बाहेर काढले. ही विहीर 80 फूट खोल होती पण जवानांनी धाडस दाखवत त्या इसमाला सुखरूप बाहेर काढले.

त्यामुळे सर्वच स्तरातून अग्निशमन दलाच्या जवानांचे कौतुक होत आहे.

दरम्यान, कोलवाळमध्ये आग लागून चार भंगारअड्डे जळून पूर्णतः खाक झाले. तरी 24 तास उलटूनही ही आग अजूनही धुमसते. या आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम अग्निशमन दलाकडून युद्धपातळीवर सुरू होते. हे चारही दुर्घटनाग्रस्त अड्डे 8 हजार चौ.मी. जागेत पसरल्याने जवानांना प्रचंड मेहनत घ्यावी लागली. या आगीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात विषारी धूर पसरला आहे.

मूशीरवाडा येथे भंगारअड्ड्यांना लागलेल्या आगीवर गोवा अग्निशमन दलाने सध्या 80 टक्के नियंत्रण मिळविले. ही आग विझविण्यासाठी आतापर्यंत 3.5 लाख लिटर पाण्याचा वापर केल्याची माहिती गोवा अग्निशमन दलाचे संचालक नितीन रायकर यांनी घटनास्थळी दिली. यावेळी म्हापसा अग्निशमन दलाचे प्रभारी बॉस्को फेर्राव हेही उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT