Shop Fire in Bicholim  Dainik Gomantak
गोवा

डिचोली बाजारात दुकानाला आग लागल्याने गोंधळ

अग्निशमन दलाच्या जवानांचे शर्थीचे प्रयत्न, मोठा अनर्थ टळला

दैनिक गोमन्तक

डिचोली : डिचोली बाजारातील एका दुकानाला आग लागून हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच धावपळ करून आग नियंत्रणात आणल्याने बाजूची अन्य दुकाने सुरक्षित राहिली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. (Shop Fire in Bicholim News Updates)

डिचोली (Bicholim) बाजारपेठेत बुधवारी पहाटे ही घटना घडली. आग नेमकी कशी लागली, ते समजू शकले नाही. फूल बाजारातील मागच्या बाजूने असलेल्या दुकानांपैकी प्रमोद नाईक यांच्या दुकानाला अचानक आग लागली. डिचोली अग्निशमन दलाला (Fire Brigade) या घटनेची माहिती मिळताच दलाच्या जवानांनी बंबासहित घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी बंद दुकानातून धूर येत असल्याचे दिसून आले.

अग्निशमन दलाच्या जवानांनी दुकानाचे शटर उघडून आग (Fire) विझवली. त्यामुळे या दुकानाला टेकून असलेली एका रांगेतील अन्य दुकाने आगीपासून वाचली. आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. आग वेळीच विझवली नसती तर रांगेतील दुकानांना आगीची झळ पोहोचून लाखोंचं नुकसान होण्याची भीती होती. मात्र अग्निशमन दलामुळे मोठा अनर्थ टळला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM SVANidhi Scheme: स्टॉल चालवणाऱ्यांसाठी मोदी सरकारचं गिफ्ट! आता मिळणार 'इतक्या' हजारांच्या विनाहमी लोनसह खास कार्ड; पीएम स्वनिधी योजनेचा धमाका

"आम्हाला फसवलं गेलं...!", पाकिस्तानी लष्कराच्या भूमिकेवर POK मधील आंदोलक संतप्त; 21 जुलैपर्यंतचा दिला अल्टिमेटम

EPFO Interest: करोडो पगारदारांसाठी आनंदाची बातमी! ईपीएफओने व्याजाचे पैसे खात्यात पाठवण्यास केली सुरुवात; असे चेक करा

Viral Video: हातात काठी, जमिनीवर पडलेला माणूस अन् थरकाप उडवणारे दृश्य, भर रस्त्यात बाईकस्वारासोबत घडला अजब प्रकार; अतरंगी व्हिडिओ व्हायरल

Gold Silver Price: लग्नसराईपूर्वी ग्राहकांना मोठे गिफ्ट! सोने आणि चांदी एकाच वेळी झाले स्वस्त; पाहा आजचे ताजे दर

SCROLL FOR NEXT