Cashew Plantation Fire Dainik Gomantak
गोवा

Cashew Plantation Fire: आगीच्या घटना कधी थांबणार? वाळपईत दोन ठिकाणी आग लागल्याची नोंद

नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, वाळपईत दोन ठिकाणी आग लागल्याची नोंद झाली आहे.

दैनिक गोमन्तक

Cashew Plantation Fire : नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, वाळपईत दोन ठिकाणी आग लागल्याची नोंद झाली आहे. हळीदवाडा केरी-सत्तरी येथे काजू बागायतीला भीषण आग लागली आहे. याची माहिती मिळताच वाळपई अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी हजार झाले आणि त्यांनी आग विझवायला सुरुवात केली. मात्र अजून त्यांना आगीवर नियंत्रण मिळवता आले नाही.

या आगीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचे सांगण्यात येत आहे.

तर आजच वाळपईत दुसरीकडे अजून एक ठिकाणी आग लागण्याची घटना घडली आहे. वाळपईत असलेल्या तिमलो खाणीजवळ सुक्या गवताला आग लागली असून उन्हामुळे ही आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, गोव्यातील अनेक भाग सध्या उष्णतेच्या कडाक्याखाली आहेत. अशा घटना गोव्यात कदाचित पहिल्यांदाच घडत आहेत. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) आगीच्या घटनांसाठी कमी आर्द्रतेसह उच्च तापमान हे कारण असल्याचे स्पष्ट केले आहे.

IMD शास्त्रज्ञ राहुल एम यांनी गोव्यातील खाजगी वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, तापमान ही पूर्णपणे अनैसर्गिक गोष्ट नाही. आपण यापूर्वीही याचा अनुभव घेतला आहे, परंतु यावेळी नक्कीच सर्वाधिक तापमान वारंवार जाणवले आहे. फेब्रुवारी महिना तुलनेने जास्त उष्ण होता. 20-30 टक्के आर्द्रता कमी असण्यामुळे कदाचित कोरडे गवत आणि जंगलात आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Sport: 'स्पोर्टिंग'च्या नवोदितांकडे सर्वांच्या नजरा! चॅरिटी कपमधून गोवा फुटबॉल असोसिएशनच्या नव्या मोसमाला सुरुवात; धेंपोविरुद्ध रंगणार थरारक लढत

Goa Women Cricket: पूजा, अथश्री, निखिलाची लक्षवेधी कामगिरी! गोव्याच्या मुलींनी हिमाचल प्रदेशला 18 धावांनी नमवले; स्पर्धेतील दुसरा विजय

Allahabad High Court: 'कोठडीत आरोपीला मारहाण करणं पोलिसांची ऑफिशियल ड्युटी नाही'! हायकोर्टानं यूपी पोलिसांना फटकारलं; काय नेमकं प्रकरण?

Goa ST Reservation: जनगणनेनंतरच गोव्यात 'एसटी' आरक्षण शक्य! मायकल लोबोंचा दावा; अद्ययावत आकडेवारीशिवाय आरक्षणाला न्यायालयीन आव्हानाची शक्यता

Bardez Development: बार्देशच्या कायापालटाचा निर्धार! मायकल लोबोंकडून प्रलंबित विकासकामांना गती; रस्ते, पूल, आरोग्य केंद्रांवर विशेष भर

SCROLL FOR NEXT