Fire at Taleigao Goa Dainik Gomantak
गोवा

Fire in Goa: वळपईतील आगीच्या घटनांनी ओलांडला 100 चा आकडा

ताळगाव येथेही सुक्या गवताला भीषण आग, शहरात मध्यवर्ती ठिकाणी धुराचे साम्राज्य

Akshay Nirmale

Fire at Taleigao Goa: गोव्यात गेल्या काही दिवसापासून विविध ठिकाणी अक्षरशः आगींच्या घटनांचे पेव फुटले आहे. संपुर्ण राज्यातून विविध ठिकाणांहून आगीच्या घटनांच्या बातम्या येत आहे.

आज, शुक्रवारी दुपारी ताळगाव येथील ऐन शहराच्या मध्यभागी असलेल्या सुक्या गवताला आग लागली होती. आणि आता उत्तर गोव्यातील वाळपईतही गवताला आग लागल्याची घटना घडली आहे.

दरम्यान, वाळपईतील आगीची ही गेल्या काही काळातील 107 वी घटना आहे. सोनशी येथील फोमेंतो माईन्स येथील सुकलेल्या गवताने दुपारी पेट घेतला. आग लक्षात आल्यानंतर तत्काळ अग्निशमन दलाला कळवण्यात आले.

त्यानंतर तत्काळ अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी तीन वाजून वीस मिनिटांनी दाखल झाली. या आगीत जीवितहानी झालेली नाही. सी. जी. मानगावकर यांच्या नेतृत्वाखाली अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग विझवली.

दरम्यान, ताळगाव येथील आयडीयल स्कूलच्या समोर असलेल्या मोकळ्या भागातील गवताने पेट घेतला. ही आग वाढत जाऊन मोठ्या प्रमाणात धुर निर्माण झाला होता. पणजी ते ताळगाव मार्गावर मोठ्या प्रमाणात धुर झाल्याने वाहनधारकांनाही त्रास झाला.

दरम्यान, वसंत विहार इमारतीकडील बाजूने अग्निशमन दलाने ही आग विझवत आणली. तर पणजीकडील बाजूनेही नागरिकांनी स्वतःच पाणी आणि झाडांच्या सहाय्याने आग विझवली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT