Nerul Fire Incident Dainik Gomantak
गोवा

Nerul Fire Incident: घरगुती गॅसच्या भडका होऊन माय-लेक भाजले; नेरुलमधील घटना

Nerul Fire Incident: घरातील दोन्ही सिलिंडर शाबूत आहेत; यात माय-लेक हे दोन्ही सुमारे २० टक्के भाजले आहेत

गोमन्तक डिजिटल टीम

म्हापसा: भाटीवाडा, नेरुल येथे घरगुती गॅसच्या गळतीने भडका होऊन माय-लेक भाजले. त्यांच्यावर गोमेकॉत उपचार सुरु आहेत. ही घटना रविवारी (ता.११) सकाळी ७.४५च्या सुमारास घडली. रात्रीच्या वेळी गॅसची गळती होऊन घरात जमा झाला असावा, परिणामी सकाळी प्रज्वलन होऊन भडका उडाला, असे प्रथमदर्शनी दिसते.

जया जीवन शिरोडकर (५०) व मुलगा दिलेश शिरोडकर (२१) असे जखमींची नावे आहेत. घरातील दोन्ही सिलिंडर शाबूत आहेत. यात माय-लेक हे दोन्ही सुमारे २० टक्के भाजले आहेत.

शिरोडकर यांचे हे घर एका खोलीचेच आहे. जखमी माय-लेक घरात झोपले होते. जखमी जया ही सकाळी झोपेतून उठल्या व त्या चहा करण्यासाठी गॅस पेटवण्यासाठी गेल्या. लायटर पेटवताच आगीचा भडका उडाला अन् त्या जमिनीवर कोसळल्या. मुलगा दिलेश हा देखील भडका उडाल्याच्या आवाजाने बिचान्यावरून खाली कोसळला व दोघेही आगीत भाजले.

आगीचा भडका उडताच खिडक्यांवरील तावदाने फुटून काचा बाहेर उडाल्या तर दरवाजा तुटून बाहेर पडला. घरा शेजारील पत्राची गॅरेजचे पत्रे देखील वाकले. सुदैवाने या काचा कुणालाही लागल्या नाहीत. शिरोडकर यांच्या घरातून मोठा आवाज येताच शेजारील लोकांनी घटनास्थळी धाव घेतली.

आगीमुळे भाजून घरात जखमी अवस्थेत पडलेल्या माय-लेकाला उचलून त्यांनी कांदोळी आरोग्य केंद्रात दाखल केले. तिथून त्यांना गोमेकॉत पाठवण्यात आले. जया शिरोडकर या ३० टक्के तर मुलगा दिलेश हा २० टक्के या आगीत भाजला. घटनेची माहिती मिळताच पिळर्ण अग्निशमन दलाचे जवान तसेच पर्वरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

५ ते १० लाखांची हानी

या आगीत शिरोडकर कुटुंबीयांच्या घरातील संपूर्ण साहित्य जळाले. तसेच घराचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अंदाजे ५ ते १० लाखांची हानी या दुर्घटनेत झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. जखमी दोघांचीही जबानी घेतल्यानंतर नुकसानीचा आकडा स्पष्ट होणार आहे. तीन महिन्यांपूर्वी दिलेश शिरोडकर यांच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यानंतर हे माता-पूत्र दोघेच घरात राहत होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT