Fire in Siolim Dainik Gomantak
गोवा

शिवोलीमध्ये राहत्या घराला आग लागल्याने हाहाकार

मध्यरात्री लागलेल्या या आगीत हडफडकर कुटुंबीयांचे लाखोंचे नुकसान

Santosh Govekar

शिवोली : मधलेंभाट-शिवोली येथील राहत्या घराला आग लागून लाखोंचं नुकसान झालं आहे. गुरुवारी मध्यरात्री अजित हडफडकर यांच्या घराला लागलेल्या भीषण आगीत घरातील महागड्या वस्तुंसह वीज उपकरणे जळून खाक झाली. या आगीत एकंदर तीन लाखांचे नुकसान झाल्याची माहिती म्हापसा अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, आग विझवण्यासाठी घराच्या छप्परावर चढलेला त्यांचा कामगार आगीची झळ चुकवण्यासाठी भिंतीवरून खाली उडी घेतल्याने त्याच्या पायांना मुका मार बसला सध्या त्याच्यावर म्हापसाच्या जिल्हा इस्पितळात उपचार सुरु आहेत. दरम्यान मध्यरात्री एकच्या सुमारास या आगीची माहिती मिळताच वेळीच घटनास्थळी पोहोचलेल्या म्हापसा अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी अडीच तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले व सात लाखांची मालमत्ता वाचवल्याचे सुत्रांनी सांगितले.

दरम्यान, हवामान ढगाळ असल्याने गुरुवारी संध्याकाळपासूनच या भागात जोराचा वारा सुटला होता. मध्यरात्रीच्या सुमारास घराच्या कौलारु छपरावरुन गेलेल्या वीज वाहिन्यांमध्ये घर्षण झाले. आगीची ठिणगी कौलारु छप्पर झाकलेल्या प्लास्टिकच्या संपर्कात आल्याने आग भडकल्याचा अंदाज म्हापसा अग्निशमन दलाकडून व्यक्त करण्यात आला आहे. या आगीत 2 वॉशिंग मशिन्स, दोन किमती लाकडाच्या खाटा, वीजेवर चालणारी किमती उपकरणे, दोन मोठ्या पाण्याच्या टाक्या, जळावू लाकडांचा साठा आदी मिळून 3 लाखाहून अधिक सामान आगीत जळून खाक झाले. पावसाच्या तोंडावर ओढवलेल्या संकटाने हडफडकर कुटुंबीय हवालदिल झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT