Fire in bushes at Khalchawada-Sal Dainik Gomantak
गोवा

खालचावाडा-साळ येथील झुडपांना आग

साळ-खालचावाडा येथील दवडाकडे येथील सुक्या गवताला अज्ञाताकडून आग लावण्याचा प्रकार घडला

दैनिक गोमन्तक

साळ: साळ-खालचावाडा येथील दवडाकडे येथील सुक्या गवताला अज्ञाताकडून आग लावण्याचा प्रकार घडला. दुपारी आगीने उग्ररूप धारण करून जवळच असलेल्या स्मशानभूमीतील झाडाझुडपांना आग लागली. स्मशानभूमीच्या 10 मीटर अंतरावर असलेल्या दलित वस्तीजवळ ही आग लागल्याने युवकांनी आग विझवण्यासाठी धाव घेतली. या वस्तीवरील महिलांनी व युवकांनी येथे पाण्याचा शिडकाव करून लागलेली आग आटोक्यात आणली.

जवळच असलेल्या विहिरीवरील एक तसेच दीड हॉर्स पॉवर पंपाचा वापर करून पाण्याचा वर्षाव करून आग विझवली. जवळच असलेल्या परसबागांचेही महिला व युवकांनी संरक्षण केले. यात प्रामुख्याने अमर परवार, योगेश परवार, राजन परवार तसेच महिलांनीही आग विझवण्यासाठी परीश्रम घेतले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope 16 September 2026: नशिबाची साथ अन् अचानक जॅकपॉट! आज 'या' राशींच्या आयुष्यात घडणार मोठी उलथापालथ; करिअरमध्ये झेप घेण्याची संधी

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

SCROLL FOR NEXT