Margao Municipal Council Dainik Gomantak
गोवा

Margao Municipal Council: ‘फायर ऑडिट अहवाला’कडे मडगाव पालिकेचे दुर्लक्ष

Fire Audit Report Margao: सर्वसमावेशक ‘फायर ऑडिट’ निष्कर्ष मडगाव पालिका मुख्याधिकाऱ्यांना पाठवला होता

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: अग्निशामक दलाने मडगावमधील दोन बाजार संकुलांचा फायर ऑडिट अहवाल सादर करून आणि सुरक्षेच्या उपाययोजना प्राधान्याने कराव्यात, अशी विनंती करून सहा महिने उलटले आहेत. मात्र मडगाव पालिकेने हा सावधगिरीच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केले आहे.

गतवर्षी नाताळच्या हंगामात मडगाव येथील न्यू मार्केटला मोठ्या आगीने वेढल्यानंतर ऑडिट करण्यात आले होते. आगीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने बैठक बोलावून ३ जानेवारी रोजी तपासणी केली होती.

१३ जानेवारी रोजी अग्निशामक सेवा उपसंचालक राजेंद्र हळदणकर यांनी सर्वसमावेशक ‘फायर ऑडिट’ निष्कर्ष मडगाव पालिका मुख्याधिकाऱ्यांना पाठवला होता. त्यात भविष्यात आगीच्या घटना टाळण्यासाठी उपाय सांगितले आहेत.

दोन्ही बाजार संकुलाना स्पष्टपणे सीमांकन आवश्यक आहे. निर्गमन, ठळकपणे दिसणारे चिन्ह, विनाअडथळा आपत्कालीन मार्ग आणि अग्निशमन उपकरणे ठेवणे आवश्यक आहेत. यात फायर हायड्रंट्स, होज रील, फायर पंप, प्रथमोपचार किट, पाण्याच्या ओव्हरहेड टाक्या आणि अग्निरोधक रंग यांचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

जगाचा नकाशा अचूकतेने मांडण्याच्या UN च्या प्रस्तावाला भारताचा पाठिंबा, पण J&K आणि लडाखच्या सीमांबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिला स्पष्ट इशारा

Keri Ambulance Service: केरीला मिळाली 3 दिवसांत 108 रुग्णवाहिका; विधानसभेत आरोलकरांनी प्रश्न उपस्थित करताच सरकारची कार्यवाही

Accident Death: दारूची नशा बेतली जीवावर; दुचाकीवरील ताबा सुटला, नाल्यात पडून 30 वर्षीय युवकाचा मृत्यू

Bank Job: SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 12,000 जागांसाठी होणार मेगाभरती, 250 नव्या शाखा सुरू करण्याचा बँकेचा प्लॅन

Congress Dalit Tribal Support: दलित-आदिवासींची साथ मिळवणे काँग्रेससाठी सोपे नाही! राहुल गांधींसमोर मोठे राजकीय आव्हान

SCROLL FOR NEXT