Panaji News : पणजी, राज्य अग्निशामक दलातर्फे ताज हॉटेल समुहाच्या २९ कर्मचाऱ्यांसाठी सर्वसाधारण आग टाळणे आणि अग्नीशमन विशेष अभ्यासक्रमाचे आयोजन २४ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान करण्यात आले. हे प्रशिक्षण लेखी आणि प्रात्यक्षिक अशा स्वरूपाचे होते.
या प्रशिक्षण शिबिराच्या समारोप समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून दलाचे संचालक नितीन रायकर उपस्थित होते. तसेच दलाचे उप संचालक राजेंद्र हळदणकर, क्षेत्रीय संचालक अनमोल अहलुवालिया, व्यवस्थापक सावियो डिमेलो आदि उपस्थित होते.
रायकर यांनी आपल्या भाषणात उनैज खान, सौजन्या व सुभाष सिंग कँवल यांनी अनुक्रमे १ ला, दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला.
त्यांच्या या यशाबद्दल रायकर यांनी विद्यार्थ्यांची प्रशंसा केली. या दलाने आतापर्यंत देशभरातील ताज हॉटेल समूहाच्या सुमारे ७७० जणांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. स्टेशन फायर ऑफिसर रवी नाईक यांनी सूत्रसंचालन केले. बॉस्को फेर्राव यांनी आभार मानले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.