Margao khareband Fire Dainik Gomantak
गोवा

Margao: खारेबांद येथील 'दाऊद चाळ' इमारतीच्या छपराला आग, सुदैवानं जीवितहानी टळली

Margao khareband Fire: खारेबांद येथील ‘दाऊद चाळ’ या इमारतीच्या तिसऱ्या मजल्याच्या छपराला आग लागण्याची घटना बुधवारी (ता.९) दुपारी २.४५ वा.च्या सुमारास घडली.

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव : खारेबांद येथील ‘दाऊद चाळ’ या  इमारतीच्या तिसऱ्या मजल्याच्या छपराला आग लागण्याची घटना बुधवारी (ता.९) दुपारी २.४५ वा.च्या सुमारास घडली. सुदैवाने या मजल्यावर कुणीही राहत नसल्याने मोठी दुर्घटना टळली. या इमारतीच्या अन्य मजल्यावर लोक राहात होते. आगीचा धूर पसरल्यानंतर या रहिवाशांमध्ये एकच घबराट पसरली.

भीतीने लोक घराच्या बाहेर पडले. शॉर्टसर्किटमुळे ही आग  लागली असावी, असा प्राथमिक  संशय मडगाव अग्निशामक दलाने व्यक्त केला आहे. यासंबंधी पुढील तपास सुरू असल्याची माहिती दलाचे अधिकारी गिल सोझा यांनी दिली. 

आग विझविण्यासाठी मडगाव अग्निशामक दलाचे दोन तर कुंकळ्ळी व वेर्णा येथून  एक-एक बंब मागविण्यात आले. ज्या भागात ही  इमारत आहे तो भाग चिंचोळा असल्याने येथून वाट काढणे दलाच्या बंबांनाही मुश्‍कील होत होते.

त्यामुळे आग विझविण्यासाठीही  विलंब लागला. आगीची घटना घडल्यानंतर योगीराज कामत, नगरसेवक दीपाली सावळ यांनीही घटनास्थळी धाव घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT