Police FIR Dainik Gomantak
गोवा

Edberg Pereira Assault Case: एडबर्ग परेरा मारहाण प्रकरणी निलंबित PSI निलेश वळवईकरांवर गुन्हा दाखल; पुढील तपास सुरु

FIR Registered Against PSI Nilesh Shirvoikar: मडगाव पोलीस कोठडीत कथित मारहाण प्रकरणी पीएसआय निलेश वळवईकरांवर एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला आहे.

Manish Jadhav

Edberg Pereira Assault Case: मडगाव पोलीस कोठडीत कथित मारहाण प्रकरणी पीएसआय निलेश वळवईकरांवर एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला. या घटनेत गंभीर जखमी झालेला एडबर्ग परेरा सध्या रुग्णालयात उपचार घेत आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पीएसआय वळवईकर यांच्यावर ही कायदेशीर कारवाई करण्यात आली. वळवईकरांवर खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्याची मागणी केली जात होती.

गुन्हा दाखल आणि निलंबनाची कारवाई

पीएसआय निलेश वळवईकर यांच्याविरुद्ध संबंधित कायद्याच्या कलम 115(2) आणि 198 नुसार एफआयआर दाखल करण्यात आला. या घटनेनंतर तात्काळ वळवईकरांवर निलंबनाची (Suspension) कारवाई करण्यात आली होती. या प्रकरणाचा सखोल तपास सुरु आहे.

एडबर्ग परेरा याला गोंधळ घालत असल्याच्या आरोपाखाली नावेली, रोझरी कॉलेजजवळून ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आले होते. पोलीस स्टेशनमध्ये पीएसआय वळवईकर यांच्याशी वाद झाल्यानंतर एडबर्ग खाली पडून गंभीर जखमी झाला. मात्र, विरोधकांनी हा पोलिसांकडून करण्यात आलेला मारहाणीचा प्रकार असल्याचे म्हटले. पोलीस कोठडीत नागरिक जखमी झाल्यामुळे पोलीस प्रशासनावर टीकेची जोरदार सरबत्ती सुरु असतानाच एफआयआर दाखल करुन पारदर्शक तपासणीची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Super Cup 2025: धडाकेबाज एफसी गोवा उपांत्य फेरीत, सुपर कप फुटबॉलमध्ये गतविजेत्यांचा इंटर काशी संघावर 3 गोलने विजय

गोव्यातील सार्वजनिक सेवेतील वाहनांना GPS ट्रॅकिंग आणि पॅनिक बटन बसविण्याची सूचना, 30 नोव्हेंबरपर्यंत मुदत

"सरकारी नोकर भरतीत अन्याय नको", दादा वैद्य चौकात मराठीप्रेमींकडून संताप व्यक्त; धो धो पावसातही मराठीप्रेमींचा निर्धार

Goa Water Taxi: गोव्यात लवकरच धावणार वॉटर मेट्रो टॅक्‍सी! प्रवाशांना मिळणार नवा पर्याय, नदीपरिवहन मंत्री सुभाष फळदेसाईंची माहिती

Shreyas Iyer Health Update: श्रेयस अय्यरने दुखापतीबद्दल दिली मोठी अपडेट, सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट

SCROLL FOR NEXT