Dharmesh Saglani Dainik gomantak
गोवा

धर्मेश सगलानी विरोधात एफआयआर दाखल, कारण..

हा गुन्हा नोंद केल्याने यामागे राजकारण असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दैनिक गोमन्तक

मडगाव : साखळी मतदारसंघात मुख्यमंत्री (CM) प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांच्या विरोधात काँग्रेसचे उमेदवार म्हणून उभे राहिलेले साखळीचे माजी नगराध्यक्ष धर्मेश सगलानी यांच्या काणकोण पोलीस स्थानकात त्यांनी फसवणूक केल्याची एफआयआर नोंद झाली आहे. ऐन निवडणुकीच्या (Election) धामधुमीत हा गुन्हा नोंद केल्याने यामागे राजकारण (politics) असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पाटणे काणकोण येथील प्रविण घनश्याम वारीक यांनी धर्मेश सागलानी (Dharmesh Saglani) विरोधात फसवणूकीची तक्रार आज काणकोण पोलिसांत दाखल केली आहे.

सगलानी यांनी आपले वडील घनश्याम वारीक यांच्या बँक (Bank) खात्यात मार्च व एप्रिल 2016 मध्ये प्रत्येकी 25 लाख व 15 लाख डिपोझीट केले. मात्र, मागाहून वडिलांकडून बेअरर धनादेश घेऊन बॅकेतून पैशांची उचल केली. त्याशिवाय वडिलांना सबरजिस्ट्रार कार्यालयात नेऊन जमिनीच्या कागदपत्रावर सही करण्यास लावून आमच्या मालकीची जमिन ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असे तक्रारीत म्हटले आहे.

या संदर्भात काणकोण पोलिसांनी सगलानी यांच्याविरूद्ध 420 कालमाखाली गुन्हा नोंद करून घेऊन चौकशी सुरू केल्याचे काणकोणचे पोलिस निरीक्षक प्रविण गावस यांनी सांगितले.

दरम्यान, पोलिसांच्या या कारवाई बद्दल आश्चर्य व्यक्त करताना, मी वारीक यांच्याविरूद्ध फसवणुकीच्या दोन तक्रारी 7 जानेवारी रोजी काणकोण पोलिसांत दिल्या आहेत. मात्र या तक्रारीची दखल अजूनही घेतलेली नाही. उलट वारीक यांनी आजच दाखल केलेली तक्रार तत्परतेने नोंद करून घेतली जाते याबद्दल आश्चर्यच वाटते असे सगलानी म्हणाले.

वास्तविक या प्रकरणी मडगाव न्यायालयात (court) दिवाणी दावा प्रलंबित आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना हा गुन्हा नोंद केला जातो ते पाहिल्यास मला निवडणुकीत प्रचाराला वेळ मिळू नये म्हणून अडकवून ठेवण्याचा हा प्रकार वाटतो असे ते म्हणाले.

आज मला काणकोण पोलीस (police) स्थानकावर चैकशीला बोलावले होते. पण मी प्रचारात व्यस्थ असल्याने मी येऊ शकणार नाही हे मी माझ्या वकिलांकडून पोलिसांना कळविले होते असे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT