Goa Police Dainik Gomantak
गोवा

Margao Theft News: नावेली चोरी तपासाला कलाटणी

Margao Theft News: संशयास्‍पद बाबी आढळल्या: अजून गुन्‍हा नोंद नाही

दैनिक गोमन्तक

Margao Theft News:

मडगाव येथे गेल्या रविवारी दुपारच्‍यावेळी आपल्‍या घरात अज्ञातांनी प्रवेश करुन कपाटात ठेवलेले 47 लाखांचे साेन्‍याचे दागिने चोरुन नेल्‍याची तक्रार अमेरिकास्‍थित रोहित वेर्णेकर या व्‍यक्‍तीने मडगाव पोलिसांत दिली आहे.

मात्र वेर्णेकर यांनी दिलेली तक्रार आणि घटनास्‍थळावरील परिस्‍थिती यात विसंगती दिसून येत असल्‍यामुळे पोलिसांनी या प्रकरणात अजूनही एफआयआर दाखल केलेला नाही.

मात्र या प्रकरणी आमचा तपास चालू आहे अशी माहिती पोलिसांनी दिली. वेर्णेकर कुटुंब हे अमेरिकत रहात असून काही दिवसांपूर्वी ते गोव्‍यात आले होते. नावेली येथे एक फ्‍लॅट भाड्याने घेऊन सध्‍या ते रहातात.

24 मार्च रोजी दुपारी 12 ते 5.30 या दरम्‍यान कुणीतरी अज्ञाताने खिडकीची काच फोडून दाराची कडी उघडून आत प्रवेश केला. नंतर आत कपाट फोडून सोन्‍याचे दागिने पळवून नेले, असे या तक्रारीत म्‍हटले आहे.

मात्र, ज्‍या ठिकाणी उभे राहून चोरट्याने काच फोडली, असा दावा वेर्णेकर यांनी केला आहे. त्‍या जागेवर जी धूळ माखली होती, ती तशीच होती. तसेच कपाट फोडल्‍याच्‍याही खुणा दिसत नाहीत, असा निष्‍कर्ष मडगाव पोलिसांनी काढला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

History: 1565 मधील तालिकोटाची ती ऐतिहासिक लढाई; एका महासाम्राज्याचा असा झाला दुःखद अंत

VIDEO: मुसळधार पावसाचा कहर! मुंबई-गोवा महामार्गावर 3 फूट पाणी, वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवाशांचा खोळंबा

History: अकबराचा धर्म 'दीन ए इलाही'

Goa Congress: ...तर गिरीश चोडणकर यांनाच हटवा! काँग्रेसला खंबीर नेतृत्वाची गरज- राधाराव ग्रासियस

Goa politics: आता शेतजमिनीही खाणार का?विजय सरदेसाई यांचा भाजप सरकारवर हल्लाबोल

SCROLL FOR NEXT