FIR against Haryana businessman for raping caretaker of villa Saligao Goa Dainik Gomantak
गोवा

Goa: हरियाणाच्या उद्योगपतीकडून केअरटेकरवर बलात्कार, ब्रिटीश व्यक्तीच्या मालकीचा गोव्यातील व्हिलाही विक्रीचा केला प्लॅन

लग्नाच्या बहाण्याने तिच्यावर बलात्कार केल्याचे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे.

Pramod Yadav

गोव्यातील साळगाव येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. साळगाव येथे व्हिलाची केअरटेकरवर म्हणून काम करणाऱ्या महिलेवर हरियाणाच्या उद्योगपतीकडून बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. सुमारे 12 वर्षांपूर्वी ही घटना घडल्याचे पीडितेने पोलिसांना सांगितले.

साळगाव मधील ब्रिटीश व्यक्तीच्या मालकीच्या या व्हिलामध्ये पीडीत महिला केअरटेकरवर म्हणून काम करत होती. लग्नाच्या बहाण्याने तिच्यावर बलात्कार केल्याचे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे.

साळगाव येथे ब्रिटीश व्यक्तीच्या मालकीचा व्हिला आहे. येथे केअरटेकरवर म्हणून काम करणाऱ्या महिलेकडेच व्हिलाची पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी दिली आहे. व्यवसायानिमित्त संशयित आरोपी वारंवार गोव्याला जायचा, एका एजंटच्या माध्यमातून तो केअरटेकरच्या संपर्कात आला आणि तिच्याशी मैत्री केली.

संशयिताने महिलेला लग्नाचे आमिष देऊन तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. व्हिलाची पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी महिलेकडे असल्याने दोघांनी व्हिला विकण्याचा प्लॅनही केला. व्हिलाची मालकी ब्रिटीश नागरिकाकडे असली तरी सध्या तो आरोपीच्या ताब्यात आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तात म्हटले आहे.

व्हिलाच्या विक्री कराराअंतर्गत पीडितेने आरोपीकडून टोकन रक्कम घेतली होती, परंतु नंतर त्यातील काही रक्कम परत केली. असे तिने पोलिसांनी सांगितले.

पीडितेने संशयिताला लग्न केव्हा करायचे असे विचारल्यावर त्याने लग्नास नकार दिला, तसेच राज्य सोडण्यास दबाव टाकला. अखेर भीतीपोटी महिलेने गोवा सोडून मुंबई, दिल्ली आणि इतर ठिकाणी काम करायला सुरुवात केली.

महिला गोव्यात परतल्यानंतर तिने पोलीस मुख्यालयात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना तिच्यासोबत घडलेल्या प्रसंगाचे कथन केले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी तात्काळ साळगाव येथे तक्रार दाखल करण्यास सांगितले.

महिलेने दिलेल्या तक्रारीच्या आधारे, साळगाव पोलिसांनी हरियाणातील व्यावसायिकाविरुद्ध कलम 376, 506 एफआयआर नोंदवली आहे. दरम्यान, आरोपीने पणजी सत्र न्यायालयात धाव घेऊन अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. त्याला चौकशीसाठी बोलावण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. संशयिताने व्हिला विक्रीचा करार त्याच्या नावे करण्यासाठी दिवाणी न्यायालयात दावाही दाखल केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT